लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यातील धनकदेवी, पकडीगुडम, धानोली गावात विकास गंगा पोहचविणारा रस्ता व पुलही मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला असून सर आली धावून आणि रस्ता गेला वाहून, असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.५ व ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवती तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसाचा फटका रस्त्यांनाही बसला आणि अनेक मुख्य मार्ग बंद झाले. पहाडावरील अनेक शेतकºयांची शेती ही उतारभागाची आहे.सुरूवातीच्या समाधानकारक पावसामुळे पिके डोलदार दिसत होती. मात्र दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यालगत असलेली शेती व उतारभागाची शेती पूर्णत: खरडून वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. नुकसानग्रस्तांचे सर्वे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.संततधार पावसाने जनजीवन विस्कळीतकोरपना : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सततधार पावसाने कोरपना तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टिमुळे तालुक्यातील वडगाव व आसन येथील शाळेचे मोठे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांना मंदिर व ग्रामस्थांच्या घरी वर्ग भरवून विद्यार्जन करावे लागत आहे. सोनुर्र्ली-पाकडहिरा, आसन खु, कढोली-आवारपुर, सवालहिरा-घाटराई मार्गावरील पुलाच्या बाजूच्या कडा तुटल्या आहे. त्यामुळे पुलावरुण मार्गक्रमण करणे धोकादायक बनले आहे. तसेच अनेक मार्गही खड्ड्यांमुळे धोकादायक बनले आहेत. त्यामुळे रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी आहे.
सर आली धावून, रस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:52 IST
तालुक्यातील धनकदेवी, पकडीगुडम, धानोली गावात विकास गंगा पोहचविणारा रस्ता व पुलही मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला असून सर आली धावून आणि रस्ता गेला वाहून, असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
सर आली धावून, रस्ता गेला वाहून
ठळक मुद्देजिवती तालुक्याला पावसाचा फटका : धनकदेवी गावाचा संपर्क तुटला