शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

साहेब, उसनवार पैसे घेऊन बांधले हो घरकूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या निधीच्या भरवशावर मंजूर  ८७ लाभार्थ्यांपैकी ३४ लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरुवात केली. आजच्या स्थितीत १४ कामे पूर्णत्वास आली आहेत तर १८ लाभार्थ्यांनी घराची स्लॅब पूर्ण केली. दोन लाभार्थ्यांनी जोता लेव्हलपर्यत काम केले आहे. काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ८० हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांनी उसनवार रुपये मागून घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटल्याने समोरील व्यक्ती उसनवारीची व्याजासहित रक्कम मागत आहे. 

राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : पंतप्रधान आवास योजनेचा निधी मागील तीन वर्षांपासून नगर परिषदेला अप्राप्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम उसनवार घेऊन पूर्ण केले. निधी आल्यावर उसनवारीचे रुपये देण्याचे आश्वासन लाभार्थ्यांनी दिले होते. आता ते लाभार्थ्यांकडे पैशाचा तगादा लावत असल्याने लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आज ना उद्या निधी येईल, या आशेवर असलेल्या लाभार्थ्यांचा भ्रमनिरास होत आहे. परिणामी लाभार्थी चातकासारखी निधीची वाट बघत आहेत. नगर परिषद मूल अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र सरकारने १३०.५ लाख रुपये तर राज्य सरकारने ८७ लाख रुपये २५ फेब्रुवारी २०१९ ला मंजूर केले. यात राज्य शासनाने ३४.८० लाख रुपये नगर परिषदेच्या खात्यात जमा केले. मात्र केंद्र सरकारने एकही निधी आतापर्यंत दिला नाही. राज्य शासनाच्या निधीच्या भरवशावर मंजूर  ८७ लाभार्थ्यांपैकी ३४ लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरुवात केली. आजच्या स्थितीत १४ कामे पूर्णत्वास आली आहेत तर १८ लाभार्थ्यांनी घराची स्लॅब पूर्ण केली. दोन लाभार्थ्यांनी जोता लेव्हलपर्यत काम केले आहे. काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ८० हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांनी उसनवार रुपये मागून घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटल्याने समोरील व्यक्ती उसनवारीची व्याजासहित रक्कम मागत आहे. 

लोकप्रतिधिनींकडून केवळ आश्वासनधनादेशाबाबत नगर परिषदेत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी अपमानास्पद भाषेचा वापर करून हाकलून लावत असल्याचे लाभार्थी सांगतात. बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अनेकदा निवेदन देण्यात देऊन केंद्राचा निधी मिळवून देण्याची मागणी केली. मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे अर्धवट घर तर दुसरीकडे उसनवारीचे पैसे या विवंचनेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी अडकला आहे. 

केंद्राचा व राज्य शासनाचा निधी मिळावा यासाठी संपूर्ण माहिती पाठविण्यात आली आहे. ही शासनाची बाब असल्याने निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्वरित लाभार्थ्यांना देण्यात येईल.-सुजित जोगे, शाखा अभियंता न. प . मूल

पंतप्रधान आवास योजनेचा निधी लवकर मिळेल या आशेवर उसनवार करून घराचे बांधकाम केले. मात्र केंद्राचा व राज्याचा काही निधी न आल्याने पैसे अडून पडले आहेत. उसनवारी पैशावर व्याज देताना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी द्यावा. -वसंता कवडू गुरनुले, लाभार्थी मूल 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना