शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एक तास चाललेल्या थराराचा ‘सिंघम’ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने दहशत माजविणाऱ्या विक्रम टाक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती रामनगरची पोलीस निरीक्षक धोबे यांना देण्यात आली. त्यांनीही वेळीच धाव घेऊन आरोपींना ताब्यात  घेत गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रात्री १०.१५ मिनिटांची वेळ. गुन्हेगारी प्रवृत्तीचा विक्रम टाक हा तरुण बाबूपेठ येथील आंबेडकर चौकातील अशोक स्पोर्टिंग क्लबजवळ आपल्या दोन-तीन साथीदारांसह हातात नंगी तलवार घेऊन उभा होता. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून वाहनांच्या काचावर तलवारीने वार करून  फोडत होता. चाकूचाही धाक दाखवून मारहाण व लूटमार करीत होता. या प्रकाराने त्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. अशातच युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे व सहकारी राहुल चव्हाण हे राजुरा येथून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपून या परिसरातून जाताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे यांना जुनी ओळख असल्यामुळे भ्रमणध्वनीवरून हा प्रकार कानावर घातला. नीलेश वाघमारे हे काही क्षणांतच ‘सिंघम’ स्टाइल घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने दहशत माजविणाऱ्या विक्रम टाक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती रामनगरची पोलीस निरीक्षक धोबे यांना देण्यात आली. त्यांनीही वेळीच धाव घेऊन आरोपींना ताब्यात  घेत गुन्हा दाखल केला.

एका बियरबारमध्येही केला राडाविक्रम टाक व त्याच्या साथीदार त्याच परिसरातील एका बियर बारमध्ये नंगी तलवार घेऊन गेले होते. तेथे धिंगाणा घालून रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत होते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

त्यांनी हद्दीचीही केली नाही पर्वाअधिकार क्षेत्रातील हद्दीची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे यांनी आपले कर्तव्य बजावले. अशाच प्रकारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणते क्षेत्र कुणाच्या हद्दीत येते, याची पर्वा न करता गुन्हेगारीचा नायनाट करून कायदा-सुव्यवस्था जर का राखून ठेवली तर मंदिरातून चप्पलही चोरी जाणार नाही, हे नाकारता येत नाही. या प्रकरणात सूरज ठाकरे यांनी जागरूकता दाखवली नसती तर हा प्रकार असाच सुरू राहिला असता.

 

टॅग्स :Policeपोलिस