शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस व भाजपकडे समसमान समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

भद्रावती पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपच्या नाजुका मंगाम यांची तर भाजपच्याच प्रवीण ठेंगणे यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली. प्रवीण ठेंगणे यांना ५ मते पडली. तर महेश टोंगे यांना २ मते मिळाली. अगोदरच्या सभापती विद्या कांबळे तर उपसभापती अपक्ष नागोबा बहादे यांचा कार्यकाळ एप्रिल २०१९ पर्यंत होता. मात्र मध्यंतरी आलेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीमुळे यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद अनुसुचित जमाती महिलासाठी राखीव होते.

ठळक मुद्देचंद्रपूर पं. स. वरही भाजपचे वर्चस्व

चंद्रपूर : चंद्रपूर पंचायत समितीमध्ये भाजपचे निर्विवाद बहुमत असल्याने सभापती व उपसभापतीवर वर्चस्व कायम राहिले. सभापती खेमा रायपुरे तर उपसभापतिपदी निरीक्षण तांड्रा हे विजयी झाले. भाजप ९, काँग्रेस २ व राष्ट्रवादी प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नीलेश गौड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. या निवडणुकीत भाजपच्या खेमा रायपुरे सभापती तर उपसभापतिपदी निरीक्षण तांड्रा विजयी होऊन सत्ता कायम ठेवली. विजयानंतर भाजप समर्थकांनी जल्लोष केला.

ब्रह्मपुरी प.सं. वर भाजपाचे वर्चस्व कायमब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या संत गाडगेबाबा सभागृहात ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाचे रामलाल दोनाडकर यांची सभापतिपदी तर भाजपच्याच सुनिता ठवकर यांची उपसभापतीपदी निवड झाली. दहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे नऊ सदस्य व काँग्रेसचा एक सदस्य आहे. भाजपमध्ये अंतर्गत कलह माजल्याने दोन गट निर्माण झाले. एका गटात रामलाल दोनाडकर, उर्मिला धोटे, प्रकाश नन्नावरे, निळकंठ मानापुरे, प्रणाली मैंद असे पाच सदस्य होते तर दुसऱ्या गटात सुनंदा ढोरे, सुनिता ठवकर, ममता कुंभारे, विलास उरकुडे असे चार सदस्य आणि काँग्रेसचा एक सदस्य थानेश्वर कायरकर असे दोन गट तयार झाले होते. एका गटाच्या रामलाल दोनाडकर यांनी सभापती पदासाठी तर उर्मिला धोटे यांनी उपसभापती पदासाठी नामांकन दाखल केले होते तर दुसºया गटाने सुनंदा ढोरे यांनी सभापती पदासाठी तर सुनिता ठवकर यांनी उपसभापती पदासाठी नामांकन दाखल केले होते. दोन्ही बाजूला ५-५ असे समसमान सदस्य संख्या झाल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. दोन्ही बाजूला समान मतदान पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात एका गटाच्या रामलाल दोनाडकर यांची सभापती तर दुसºया गटाच्या सुनिता ठवकर यांची उपसभापती निवड झाली.

राजुरा पं.स.वर काँग्रेसचा झेंडाराजुरा : राजुरा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेदची निवड झाली तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मंगेश गुरनुले यांची निवड झाली. राजुरा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बल्लारपूर पं. स.वर भाजपाचबल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी सभापती पदावर भाजपाच्या इंदिरा रमेश पिपरे यांची तर उपसभापती पदी भाजपाच्या सोमेश्वर पद्मगिरीवार यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार आर. एन. कुळसंगे यांनी केले. बल्लारपूर पंचायत समितीत एकूण चार सदस्य असून येथे भाजपाचे वर्चस्व आहे. सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते. यासाठी भाजपाच्या मानोरा - इटोली गणातील इंदिरा रमेश पिपरे यांनी सभापती पदासाठी तर कोठारी - पळसगाव गणाचे उमेदवार सोमेश्वर पद्मगिरीवार यांचे उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आले. यामुळे दोनही पदाची अविरोध निवड झाली.

सावलीत काँग्रेसचे सभापतीसावली : सावली पंचायत समितीत आठ सदस्य संख्या असून काँग्रेस व भाजपकडे समसमान चार सदस्य संख्या आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विजय कोरेवार तर उपसभापती पदी भाजपचे रवींद्र बोलीवार यांची निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पुष्पलता कुमरे यांनी मतदान घेतले असता दोन्ही पदासाठी समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला. 

कोरपना पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडाकोरपना : कोरपना पंचायत समिती सभापतीपदी अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने काँग्रेस पक्षाच्या रुपाली तोडासे यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली असून उपसभापती पदाकरिता काँग्रेसच्या सिंधुताई आस्वले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात भाजपाच्या नुतनकुमार जीवने यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली. सिंधुताई आस्वले यांनी नुतनकुमार जीवने यांना पराभुत करून उपसभापतीपदी विराजमान झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र वाकलेकर व गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया योग्य रितीने हाताळली. यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीपदी निवड झाल्याने पंचायत समितीद्वारे सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीधरपाटील गोडे होते. गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीनचा सत्कार केला.भद्रावती पं.स.वर भाजपच्या ताब्यातभद्रावती : भद्रावती पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपच्या नाजुका मंगाम यांची तर भाजपच्याच प्रवीण ठेंगणे यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली. प्रवीण ठेंगणे यांना ५ मते पडली. तर महेश टोंगे यांना २ मते मिळाली. अगोदरच्या सभापती विद्या कांबळे तर उपसभापती अपक्ष नागोबा बहादे यांचा कार्यकाळ एप्रिल २०१९ पर्यंत होता. मात्र मध्यंतरी आलेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीमुळे यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद अनुसुचित जमाती महिलासाठी राखीव होते. त्यानुसार भाजपचे नाजुका मंगाम यांची अविरोध निवड करण्यात आली. आठ सदस्य संख्या असलेल्या भद्रावती पंचायत समितीमध्ये भाजपचे ४, कॉंग्रेस १, अपक्ष १ व शिवसेनेचे २ असे पक्षीय बलाबल आहे. यात नाजुका मंगाम (भाजप), प्रविण ठेंगणे (भाजप), महेश टोंगे (भाजप) व विद्या कांबळे (भाजप), अश्विनी ताजणे (शिवसेना) व वनिता कारमेघे (शिवसेना) तर चिंतामन आत्राम (कॉंग्रेस) व नागोबा बहादे अपक्ष आहेत.नागभीड पं.स.वर काँग्रेसचा झेंडानागभीड : नागभीड पं.स.च्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रणया गड्डमवार यांची तर उपसभापतीपदी रवी देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. नागभीड पं.स.चे सभापतिपद सर्वसाधारण प्रवगार्साठी होते. आठ सदस्यीय या पंचायत समितीत काँग्रेसकडे ५ तर भाजपकडे ३ सदस्य आहेत. काँग्रेसकडे ५ सदस्य असल्याने आणि सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदावर कोणाची वर्णी लागेल याची शेवटपर्यंत उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये होती. सदस्यांच्या झालेल्या बैठकीत गड्डमवार यांच्या नावावर एकमत झाल्याने सभापतिपदासाठी त्यांचे तर उपसभापतिपदासाठी रवी देशमुख यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. उपसभापतिपदासाठी भाजपच्या रागिणी गुरूपुडे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. पण नंतर त्यांनी माघार घेतली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदासाठी गड्डमवार व देशमुख यांचेच नामनिर्देशन उरल्याने त्यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली. उल्लेखनीय बाब ही की, यापूर्वी रवी देशमुख हे मागील टर्ममध्ये सभापतिपदी होते.पोंभुर्ण्यात साशंकतापोंभुर्णा : पंचायत समिती पोंभुर्णा येथील सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होती. परंतु सभापतिपदाकरिता नामनिर्देशन दाखल न झाल्याने रद्द झाली. सदर प्रक्रिया उद्या गुरुवारी घेण्यात येणार असली तरी पक्षांतर्गत बंडखोरी झाल्याने निवडणुकीबाबत सांशकता आहे. चार सदस्यीय असलेल्या पंचायत समितीत चारही सदस्य भाजपाचे आहेत.सभापती पद अनुसचित जमाती (सर्वसाधारण) करिता आरक्षित असल्याने आणि यापूर्वीही सर्वसाधारणमधून याच प्रवर्गाच्या अल्का आत्राम यांनी सभापती पद तर उपसभापती पद विनोद देशमुख यांनी भुषविले होते.परंतु तत्कालीन परिस्थितीत दोघेही आपल्या पदावरून मागे हटण्यास तयार नसल्याने उर्वरित गंगाधर मडावी व ज्योती बुरांडे यांनी सुद्धा ठरल्याप्रमाणे ताठर भूमिका घेतल्याने वेळेत निवडणुकीकरिता नामनिर्देशन सादर करण्यात आले नाही.

टॅग्स :Politicsराजकारण