शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यही नसताना सचिव म्हणून स्वाक्षऱ्या

By admin | Updated: July 23, 2016 01:38 IST

प्रतापसिंग शिक्षण संस्था, पिपर्डाद्वारा संचालित आदिवासी आश्रमशाळा कवठाळा, नांदगाव, चंदनवाही, जिवती व कोर्टामक्ता ...

प्रतापसिंग शिक्षण संस्थेचा प्रताप : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार कोरपना : प्रतापसिंग शिक्षण संस्था, पिपर्डाद्वारा संचालित आदिवासी आश्रमशाळा कवठाळा, नांदगाव, चंदनवाही, जिवती व कोर्टामक्ता या सर्व आश्रमशाळांना शासनाकडून दरवर्षी अनुदान मिळते. संस्था सचिवाच्या मृत्यूनंतर २०१५-१६ या सत्राचे शासनाकडून मिळालेले सर्व अनुदान संस्थेचा सदस्यही नसताना सचिव म्हणून स्वाक्षऱ्या करून पिंक्लेश्वर राठोड या व्यक्तीने उचलल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उजेडात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे, पिंक्लेश्वर राठोड हा संस्थेचे मृत सचिव सुधाकर राठोड यांचा मुलगा आहे. सद्यस्थितीत संस्थेतील ११ पैकी पाच सदस्यांचा मृत्यू झालेला आहे. संस्थेच्या प्राथमिक सदस्यांनी धमार्दाय आयुक्ताकडे कसल्याही प्रकारचा बदल अर्ज दिला नसताना पिंक्लेश्वर राठोड यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून संस्थेचे लाखों रुपयाचे अनुदान बनावट सहीच्या आधारे दिले कसे, असा सवाल संस्थेचे प्राथमिक सदस्य बाळकृष्ण कोमावर व नामदेव मडावी यांनी पत्रकार परिषदेत केला. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी संस्था हडपण्याच्या दृष्टीने संस्थेत नातेवाईकांना सभासदत्व देण्याचा प्रयत्न केला होता. प्राथमिक सभासदांच्या खोट्या सह्या करून धमार्दाय आयुक्तांकडे बदल अर्ज सदर केला होता. मात्र संस्थेच्या प्राथमिक सभासदांनी आक्षेप घेऊन सदर बदल अर्ज मंजूर होऊ दिला नाही. त्यामुळे पिंक्लेश्वर राठोड हे संस्थेचे सदस्य अथवा सचिव नसून त्यांचा संस्थेशी कसलाही संबंध नसताना त्यांच्याकडून होणारी अनुदानाची उचल ही शासनाची फसवणूक आहे. शासनाने पिंक्लेश्वर राठोड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हडप केलेली रक्कम वसूल करावी व दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करावी, अशी मागणी बाळकृष्ण कोमावर व नामदेव मडावी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)