शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देघोडाझरी सिंचन विभागाचे दुर्लक्ष : मायनरचे पाणी शेवटपर्यंत पोहचतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरीच्या तलावावर नवरगाव-गडबोरी परिसरातील बरीच धान शेती अवलंबून आहे. तलावही सोडलेला आहे. परंतु ज्या कालव्याच्या सहायाने पाणी येते. त्यामध्ये झुडपे वाढली असून कचऱ्याचेही साम्राज्य आहे. यामुळे पाण्याच्या गतीला अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी कालवा फुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे. यावर्षीसुद्धा नवरगावकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ काढलेला नाही. केवळ कालव्यातील काही भागातील कचरा कापण्याचे काम करण्यात आले आहे. तर काही भागात अजूनही कचरा तसाच आहे. त्यामुळे पाणी वाहण्याची गती मंदावणार असून कालवा फुटण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या. परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही शेतकरी विभागाच्या कारभाराला कंटाळले असून स्वत:च पाण्याचे स्त्रोत निर्माण करीत आहेत.गाळ काढण्याची मागणीपाण्याचे नियोजन करण्यासाठी कालव्याला सिमेंट पायºया बसवून उपवितरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु बऱ्याच ठिकाणच्या पायऱ्या फुटल्या आहेत. या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याने घोडाझरी सिंचाई शाखेने पाण्याचे योग्य नियोजन करून कालव्यातील कचरा व गाळ काढून गडबोरी वानेरी, वाकड या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांकडून स्वच्छतानवरगाव-गडबोरी या कालव्याची अशी स्थिती आहे. तर उपकालव्याची काय असेल,मध्येही कचºयाचे साम्राज्य आहे. ज्या शेतकºयांना गरज आहे असे शेतकरी उपकालव्यातील कचरा काढतात आणि पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प