शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टकट विधीमुळे विवाहाचा चेहरा बदलला

By admin | Updated: May 12, 2014 23:30 IST

सध्या ग्रामीण व शहरी भागात लगीन घाई सुरु झाली आहे. महागाईच्या वाढत्या झळीमुळे बचाव करण्यासाठी झटपट विवाह ही संकल्पना मुळ धरु लागली आहे.

विरुर (स्टे.) : सध्या ग्रामीण व शहरी भागात लगीन घाई सुरु झाली आहे. महागाईच्या वाढत्या झळीमुळे बचाव करण्यासाठी झटपट विवाह ही संकल्पना मुळ धरु लागली आहे. त्यामुळे लग्नाची दहा दिवसाची कसोटी एका दिवसात होत आहे.

पूर्वी सुमारे एक दोन महिने वधू आणि वराकडील कुटुंबाची प्रचंड धावपड, पैशाची जुळवाजुळव, निमंत्रण पत्रिका छापणे, पाहुण्यांची निमंत्रणे आदींची लगबग बघायला मिळायची. कपड्यांची खरेदी, मानपानाची व्यवस्था, अशी गडबडही असायची. आता सर्वच क्षेत्रात आलेल्या शॉर्टकटने मात्र सर्व कार्यक्रम आणि पारंपारिक चालत आलेला विवाह पद्धतीचा चेहराच बदलून टाकला. ‘वन डे प्रोग्राम’ मुळे लग्नाचे स्वरूपच बदलले आहे. ‘चट मंगणी, पट ब्याह’ या प्रमाणे विवाह होत आहे. त्यामुळे पूर्वी लग्नामध्ये आवश्यक असलेले बोहले, मंडप आता कालबाह्य होत आहे.

ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांच्या घराची रंगरंगोटी, देवी-देवतांची चित्र काढून शुभकार्याला प्रारंभ करायचा अशी पद्धत होती. मुलीच्या घरचे लग्न असेल तर, वधू पित्याची प्रचंड धावपड असायची. दोन ते आठ दिवस हळदीचा कार्यक्रम चालायचा. नवरदेव या कार्यक्रमामुळे वैतागून जायचा. पण परंपरा पाळली जायची. नवरदेवाला हळद लावण्यासाठी खास चिखल मातीचा बोहला बनवला जायचा. एखाद्या ठिकाणी तीन बाजूने औताच खोड आणि एका बाजूने चिखलाचे गोळे लावून निमूळती घेत वरच्या बाजूला कळसाचा आकार दिला जात असे. या बोहल्याची विविधता पूजा करुनच नवरदेवाला त्यावर बसवून हळद लावली जायची. म्हणूनच एखादा लग्नासाठी घाई करत असेल तर, त्यास बोहल्यावर चढायची घाई झाली का, असे म्हटले जाते. बोहल्याचा तसेच एरंडाचा लहानसा मंडप केला जात होता. यात वर-वधूला सुवासिनी पारंपारिक गाणी म्हणून आणि उखाण्यात नावे घेऊन हळद लावण्याचा कार्यक्रम असायचा. त्यानंतर आंघोळ व पुन्हा हळद असा हा कार्यक़म असायचा. या सर्व पद्धतीमुळे वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असायचा. पाच दिवसाचे लग्न करायचे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचा मोठा भाग होता.

साखरपुड्याची खर्चिक प्रथा संपुष्टात येण्याची स्थिती आहे. बोहला ही पद्धत सार्वजनिक मंगल कार्यालये आणि मोठय़ा मंदिरात विवाह समारंभ सुरु झाल्यापासून बंद होत आहे. तरीही सध्या ग्रामीण भागात काही ठिकाणी बोहला उभा केल्याशिवाय लग्न होत नाही. (वार्ताहर)