शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनात अडकले लघु कालव्याचे काम

By admin | Updated: December 6, 2014 01:21 IST

राजुरा तालुक्यातील डोंगरगाव गावाजवळील स्थानिक नाल्यावर डोंगरगाव तलाव मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ५ आॅगस्ट १९७७ ला १४९.७५३ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

राजुरा तालुक्यातील डोंगरगाव गावाजवळील स्थानिक नाल्यावर डोंगरगाव तलाव मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ५ आॅगस्ट १९७७ ला १४९.७५३ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे राजुरा तालुक्यातील चिंचाळा, डोंगरगाव, विरुर स्टे. सुब्बई, तुम्मागुडा, धानोरा, कविठपेठ, चिंचोली या गावातील २८१६ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. डोंगरगाव प्रकल्पासाठी आय. बी. पी. अंतर्गत केंद्रीय अर्थसाह्य प्राप्त असून २०१४-१५ करीता केंद्रीय अर्थसहाय्य सलगता प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. १ एप्रिल २०१४ ची सुरुवातीची शिल्लक रक्कम ३.३५ कोटी व २०१४-१५ मध्ये १३.०० कोटींची आर्थिक तरतुद अशी सप्टेंबर महिन्या अखेरीस २.४४ कोटी रुपये योजनेच्या कामासाठी खर्च झाले आहेत. मात्र, कालव्याची कामे कंत्राटदारांमुळे पुढे सरकत नसल्याने लघु कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. डोंगरगाव प्रकल्पासाठी २३७.५९ हेक्टर वनजमीनीस २२ आॅगस्ट १९९५ ला केंद्र शासनाने अंतिम मान्यता दिली. कालव्याच्या कामासाठी सुधारीत संरेखा बदलाच्या वनप्रस्तावलाही केंद्र शासनाने २२ जून २०१० ला मंजूरी दिली आहे. प्रकल्पाला २७६.५९ हेक्टर खाजगी जमीन व सरकारी जमीनीची आवश्यकता असून २६९.५२ हेक्टर खाजगी जमीन संपादीत करण्यात आली तर उर्वरीत ६.९३ हेक्टर खाजगी जमीन संपादनासाठी भूसंपादन प्रस्ताव महसूल विभागामार्फत कार्यवाहीत आहे. मात्र, अद्याप भूसंपादन कार्यवाही न झाल्याने लघु कालव्याची कामे थंडबस्त्यात आहेत. २००१-०२ पासून धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असले तरी १०९७ हेक्टर शेतीला लघु कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांमार्फत सुरु असलेले काम लवकर झाल्यास लघु कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते. मात्र, अधिकारी कंत्राटदारांना केवळ दंडनिय मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव तयार करण्यात व्यस्त आहेत.