शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नातवाने आजोबाची हत्या करून घरीच पुरला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 20:50 IST

Chandrapur News आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले.

ठळक मुद्देआईनेच केली मुलाची तक्रारदुर्गंधीमुळे ४५ दिवसांनी घटना उघडकीस

चंद्रपूर : आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, शंकरपटाच्या निमित्ताने आरोपीची आई लाडबोरीला आली आणि तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले. पोलिसांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून आरोपीला अटक केली.

आरोपीच्याच आईच्या तक्रारीवरून आरोपी असलेल्या नातवाला अटक करण्यात आली आहे. सूरज सुधाकर सेलकर (वय २५, रा. बेंबाळ, ता. वरोरा) असे आरोपीचे नाव आहे, तर कवडू देटे (७५, रा. लाडबोरी) असे मृताचे नाव आहे. आरोपी सूरज हा आपल्या आईच्या वडिलांकडे म्हणजे मृत कवडू देटे यांच्याकडे मागील काही दिवसांपासून राहत होता. पैशावरून आरोपी सूरज व मृत कवडू देटे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी सूरज व कवडू देटे यांच्यात वाद झाला. यात सूरजने आजोबा कवडू देटे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह घरासमोरील मातीत पुरला.

दरम्यान घटनेच्या ४५ दिवसांनंतर सोमवारी आरोपीची आई शंकरपटानिमित्त लाडबोरी येथे आली. घरात दुर्गंधी येत असल्याचे तिला जाणवले. काही ठिकाणी रक्ताचे डागही आढळले. शिवाय वडील कवडू देटे हेदेखील दिसत नसल्याने तिला संशय आला. तिने याबाबत सूरजला विचारले असता सूरजने हत्येची कबुली दिली. आईच्या तक्रारीवरून मंगळवारी सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला व आरोपी सूरज सेलकर याला अटक केली आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी