लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : महावितरण कंपनीमार्फत राज्यातील सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. ग्राहकाने केलेला वीज वापर मोजून त्याचे देयक ग्राहकांना दरमहा दिले जाते. प्रति युनीट दर शासनाच्या वीज नियामक मंडळाने ठरवून दिलेला आहे. मात्र या वीजदरांव्यतिरिक्त इतर आकारही लावले जात असल्याने ग्राहकांना वीज बिल दुपटीच्या जवळपास वाढून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना शासनाने ठरवून दिलेला वीजदर केवळ फार्स वाटत आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वत्र वीज वापर वाढतो. त्यामुळे ग्राहकांना येत असलेली वीज बिले चकित करणारी ठरत आहेत.महावितरणने वीज बिलात पारदर्शकता आणण्यासाठी छापील बिलात अनेक बाबींचा समावेश केला आहे. वीज दराचा तक्ता, पेमेंट हिस्टरी, वीज वापराचा मागील अकरा महिन्यांचा आलेख, क्यूआर स्कॅन कोड, पुढील महिन्याची रिडिंगची संभाव्य तारीख व तक्रार निवारण याचे संकेस्थळ आता छापील बिलावरच देण्यात येत आहे. मात्र इतर अनावश्यक आकार ग्राहकांना आकारल्या जात असल्याने वीजदराचा ताळमेळ जुळविता ग्राहक थक्क होत आहे.महावितरणने स्थिर आकार ५० रुपयांवरून वाढवून ९० रुपये प्रतिमाह केला आहे. याशिवाय वहन आकार १.२८ रुपये प्रतीयुनिट दराने आकारला जातो. इंधन समायोजन आकार वीज वापराच्या टप्प्यानुसार वेगवेगळा लावला जातो. तो ०.३६० रुपये ते ०.८८० रुपये प्रति युनीटप्रमाणे आकारला जातो. तसेच एकूण बिलावर १६ टक्के दराने वीज शुल्क आकारले जाते. हे सर्व मिळून ग्राहकांचे महिन्याचे वीज बिल तयार होत.विद्युत नियामक आयोगाने १ एप्रिल २०१९ पासून नवे वीजदर निर्धारित केले आहे. १ ते १०० युनिटच्या वापरावर ३.०५ रुपये दर लावला जातो. त्यानंतर १०१ ते ३०० युनिटसाठी ६.९५ रुपये, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९.९० रुपये, ५०१ ते १००० युनिट साठी ११.५० रुपये, हजारपेक्षा अधिक युनीट वापरासाठी १२.५० रुपये दर आकारला जातो. त्यामुळे मोठ्या ग्राहकांना येणारे वीज बिल धक्कादायक असते.डीजिटल माध्यमाने बिलाचा भरणा केल्यास ०.२५ टक्के सूट मिळते. ग्राहकाने वीज बिलाचा भरणा धनादेशाने केल्यास व तो धनादेश बाउन्स झाल्यास ग्राहकांना महागात पडणारा आहे. १ सप्टेंबर २०१८ पासून चेक बाउन्स चार्जेस ७५० रुपये करण्यात आले आहे.
महावितरणच्या दुप्पट दराने वीज ग्राहकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:23 IST
महावितरण कंपनीमार्फत राज्यातील सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. ग्राहकाने केलेला वीज वापर मोजून त्याचे देयक ग्राहकांना दरमहा दिले जाते. प्रति युनीट दर शासनाच्या वीज नियामक मंडळाने ठरवून दिलेला आहे.
महावितरणच्या दुप्पट दराने वीज ग्राहकांना शॉक
ठळक मुद्देग्राहकात संताप : ऐन वेळेवर ग्राहकांच्या हातात बिल