लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील शिवणी चोर उपसा सिंचन योजनेच्या संपूर्ण लाभक्षेत्राकरिताच बंद नलिकाद्वारे सिंचन प्रस्तावित असून चांदा ते बांदा उपक्रमाखालील प्रस्तावित कामाला सध्याचे प्रचलित मापदंडानुसार ५.५६ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी विशेष दुरुस्ती अंतर्गत कालवा प्रणालीवर १०.६२ लक्ष खर्च झालेला आहे. यामुळे तेथे परत संपूर्ण लाभक्षेत्रात पीडीएन करणे ही बाब धोरणात्मक ठरत असल्याने सदर प्रस्तावास ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता मिळणेबाबतच्या प्रस्तावावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्यांची शेरेपुर्तता करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.शुक्रवारी विधानसभेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्र्यांनी वरील माहिती दिली. शिवणी चोर उपसा सिंचन योजना सुरु करण्याबाबतच्या शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत आि. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारला होता. चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्लेटलेट्स अफेरेसिस यंत्र उपलब्ध करुन देण्याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सदर यंत्र सामुग्री खरेदीचे पुरवठा आदेश २६ फेब्रुवारी २०२० रोजी निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेजचे काम सुरु करण्याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की या बॅरेजच्या मुख्य बांधकामाकरिता फक्त एकदाच निविदा काढण्यात आलेली असून त्याअन्वये निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येवून कंत्राटदारास कार्यरंभ आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे व बॅरेजचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम जानेवारीमध्ये सुरु करण्यात आल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
शिवणी चोर उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST
शुक्रवारी विधानसभेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्र्यांनी वरील माहिती दिली. शिवणी चोर उपसा सिंचन योजना सुरु करण्याबाबतच्या शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत आि. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारला होता.
शिवणी चोर उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळणार
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांच्या तारांकित प्रश्नाला जलसंपदा मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर