आॅनलाईन लोकमतचिमूर : केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण सोहळा आणि शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य दिपाली मेश्राम, पंचायत समिती उपसभापती विलास उरकुडे, पंचायत समिती सदस्य संतोष रडके, ममता कुंभरे, बंडू जावडेकर, सरपंच मुक्ता उरकुडे, सूर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी यावेळी कुर्झा ते नांदगाव रस्ता येत्या एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील महिलांना चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी उज्वला गँस योजना सुरू केली आहे. या योजनेत केवळ १०० रूपयात गँस जोडणी दिली जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.
शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:44 IST
केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : नांदगाव येथे पुतळ्याचे अनावरण