लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. संकटात अडकलेल्या अनेकांना भोजन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. अशा मंडळींना आता सहजपणे जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारपासून शिवभोजनाची थाळी ‘पॅकेट्स’ मधून देणे सुरू केले.शासनाकडून शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रूपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रूपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता नागरिकांना केवळ पाच रूपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंतन भोजन उपलब्ध होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रूग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकाऱ्या उपाययोजना सुरू केल्या. त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. परंतु या काळात हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरून आलेल्यांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने गरीब नागरिकांसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचे लक्ष्यांकही वाढविण्यात आले. सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर असल्यामुळे शासन व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. शासनाने थाळीऐवजी आता शिवभोजन पॅकेट्स स्वरूपात विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.भोजनालयात पाळा सोशल डिस्टन्सिंगशिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध द्यावे. तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भोजनालय चालकांनी जेवण तयार करण्याआधी हात कमीतकमी २० सेकंद साबणाने स्वच्छ करावे. शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करावे. भोजन तयार करणारे तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावे, भोजनालयातील कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.मनपातर्फे गरजुंना दोन्ही वेळेचे भोजनइतर शहर व राज्यातील नागरीक, अडकलेले कामगार, विस्थापित व स्थानिक गरजुंना भोजनाची अडचण निर्माण होत असल्याने गुरूवार सायंकाळपासून मनपातर्फे नियमितरित्या दोन्ही वेळेचे भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली.बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळीयावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक सचिन पाटील, शीतल वाकडे, शहर अभियंता महेश बारई व नगरसेवक उपस्थित होते.संचारबंदीमुळे अनेकांसमोर भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. अशा संकटात सापडलेल्या व्यक्तींना सहजपणे भोजन मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. भोजन ‘पॅकेट्स’ मधून मिळणार असून वेळही वाढविण्यात आली.- राजेंद्र मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर
शिवभोजनाची थाळी आता ‘पॅकेट्स’मधून मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST
शासनाकडून शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रूपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रूपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता नागरिकांना केवळ पाच रूपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंतन भोजन उपलब्ध होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रूग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत.
शिवभोजनाची थाळी आता ‘पॅकेट्स’मधून मिळणार
ठळक मुद्दे‘कोरोना’पासून खबरदारी : सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत थाळी उपलब्ध