शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या पोटाला शिवभोजनाचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये २२ शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गरिबांसाठी आधार : जून महिन्यात तब्बल ७९ हजारांवर थाळींचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये गरजू, गरीब, विमनस्क नागरिकांना भोजन मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू केली. शिवभोजन योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली. दहा रुपयाला मिळणारी शिवभोजन थाळी आता पाच रुपयाला मिळायला लागली. मंत्रीमंडळातील निर्णयाप्रमाणे शिवभोजन थाळी पुढील तीन महिने पाच रुपये या दरातच मिळणार आहे. कोरोना संसर्ग व लॉकडाऊनच्या काळात अनेक गोरगरिबांना शिवभोजनाचा घास मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये तब्बल ७९ हजार ४२४ थाळींचे वितरण झाले आहे.जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये २२ शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, तालुकास्तरावरील पुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व गरीब, गरजू नागरिकांना शिवभोजन मिळावे, यासाठी अविरत कार्य करीत आहे.कोरोनाच्या काळामध्ये गरजू, गरीब, स्थलांतरित, कष्टकरी, विमनस्क तसेच अनेक नागरिकांच्या हाताला काम नाही, अशा नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी आधार होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व तालुका, ग्रामीण मिळून एकूण ७९ हजार ४२४ थाळी पॅक फूडद्वारे जून महिन्यात वाटप करण्यात आले आहे. या शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांना पोटाची खळगी भरताना मोठी मदत होत आहे.स्वच्छता व सुरक्षेची विशेष काळजीकोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शिवभोजन थाळी वाटप करताना शिवभोजन केंद्राद्वारे विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ न देता व सुरक्षित अंतर ठेवून भोजन हे थाळीद्वारे वाटप न करता फुड पॅकद्वारे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन केंद्रावर स्वच्छतेची, सुरक्षतेची काळजी प्रामुख्याने घेण्यात येत आहे. नागरिकांना सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अ‍ॅपमध्ये होते थाळीच्या प्रकाराची नोंदपुरवठा विभागाला थाळींच्या वितरणाची दैनंदिन माहिती मिळावी यासंदर्भात लेखाजोखा ठेवण्यासाठी स्वतंत्र शिवभोजन अ‍ॅप सुरू केले आहे. या संबंधित सर्व माहिती अ‍ॅपमध्ये शिवभोजन केंद्र चालक नोंद करीत असतात. याद्वारे दैनंदिन भोजनाचा प्रकार तसेच लाभार्थ्यांचे नाव, फोटो याची नोंद घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नागरिकांना भोजनाच्या गुणवत्ते संदर्भात अभिप्रायसुद्धा या अ‍ॅपद्वारे नोंदविण्यात येत आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय