शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालकाचा जीव वाचविण्यासाठी ‘तिने’ दिली नागाशी झुंज; अखेर प्राण सोडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:08 IST

झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली.

ठळक मुद्देआकोला येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. तो मरेपर्यंत माणसाची सेवा करतो. तसाच प्रत्यय काल आला. मालकाचा जीव वाचवितांना झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. परिसरात झिबली नावानी प्रसिद्ध असलेल्या कुत्रीच्या जाण्याने अख्खे गाव हळहळले.

वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील भास्कर चवले यांच्याकडे एक कुत्री होती. त्यांनी बारा वर्षांपूर्वी ते पिल्लू आणले. त्यांचा मुलगा निखीलने त्या पिल्लाचं झिबली असं नामकरण केलं. दिवसामागून दिवस गेले. झिबली मोठी होऊ लागली. आणि तिने आपले कारनामे दाखविणे सुरू केले.

झिबली जरा हटके स्वभावाची कुत्री होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आकोला परिसरात तिचे अनेकजण चाहते झाले होते. झिबली नुसती माणसाळलेली नव्हती तर तिने मानवी स्वभावाशी, मानवी संवेदनेशी समरसता साधली होती. झिबलीला जेव्हा अन्न मिळायचे, तेव्हाच ती जेवण करायची. तिच्या प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरणे सांगण्यासारखे आहेत.

बुधवारी दुपारी भास्कर चवले, त्यांची पत्नी शशिकला, मुले अनिकेत आणि निखील शेतात काम करित होते. झिबली शेतात खेळत होती. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने झिबलीला येतांना दिसला. आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला. काही वेळानी चवले कुटूंबियांना ही होत असलेली झटापट लक्षात आली. त्यामुळे हातचे काम टाकून ते सर्वच धावले. त्यावेळी झिबलीच्या तोंडात मृत नाग असल्याचे त्यांना दिसले. चवले परिवार झिबलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना तिने आपले प्राण त्यागले.

झिबली आणि नागाच्या झुंजीची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. अनेकजण तिला पहायला शेतात आले. झिबलीच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण गाव हळहळले. झिबलीने चवले आणि गावाची बारा वर्ष इमाने- इतबारे सेवा केली. तिची अचानक झालेली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. त्यानंतर झिबलीची अंतयात्रा काढून शेतात दफन करण्यात आले. झिबलीचा सहवास लाभलेल्या चवले कुटूंबियांनी झिबली नेहमी स्मरणात राहावी म्हणून ३० जूनला छोटेखानी तेरवी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :dogकुत्रा