शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासमोर सातासमुद्रापारचे अंतर झाले थिटे; फॉरेनची लेक झाली पोवनीची सून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:26 IST

Chandrapur : भारतात येऊन केले लग्न आता स्वित्झर्लंडमध्ये होणार स्वागत समारंभ

बी. यू, बोर्डेवार, प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा/गोवरी : प्रेमाला वयाचे, जातीचे, भाषेचे, अगदीच काय तर वर्णाचेही बंधन नसते. म्हणूनच प्रेमाची महती आजवर कुणीही टाळू शकला नाही, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवकाने तर प्रेमासाठी सातासमुद्रापारचेही अंतर थिटे करून टाकले आहे. कामानिमित्त स्वित्झर्लंड येथे असलेल्या या युवकाचे तेथील एका युवतीशी प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका झाल्या आणि तिला घेऊन तो चक्क आपल्या मूळ गावी पोवनी येथे आला. त्यानंतर कुटुंबीयांची समजूत काढत बल्लारपुरातील एका सभागृहात तिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. 

राजुरा तालुक्यातील पोवनी येथील उद्धवराव फुलझेले यांचे चिरंजीव मिनल फुलझेले यांचा विवाह स्वित्हालँडमधील डायना कॉड्राशिना नामक युवतीसोबत बल्लारपूर येथील संत तुकाराम सभागृहात ७ ऑगस्टला पार पडला. राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कुशीत वसलेले पोवनी हे छोटेसे गाव. काही वर्षांपूर्वी उद्धव फुलझेले नोकरीच्या निमित्ताने बल्लारपूर येथे स्थायिक झाले. त्यांना दोन मुले आहेत. उद्धव फुलझेले यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आई आणि मुलावर कुटुंबाचा भार आला. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा मुलगा मिनल हा स्वित्हार्लंड येथे शिक्षणासाठी गेला. मिनल फुलझेले शिक्षणानंतर तिथेच सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. या युवकाचे तेथीलच डायना कोंड्राशिना या युवतीसोबत प्रेम जुळले. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही थेट भारतात आले. आपल्या पोवनी येथील गावी गेले. त्यानंतर मिनलचे कुटुंब बल्लारपुरात राहत असल्याने ते बल्लारपुरात आले. मिनलने कुटुंबीयांना डायनाबाबत माहिती देत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बल्लारपूर येथील संत तुकाराम महाराज सभागृहात ७ ऑगस्टला कुटुंबीयांच्या साक्षीने दोघेही विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याला माजी आमदार सुदर्शन निमकर हे सपत्नीक आवर्जून उपस्थित होते. याशिवाय फुलझेले कुटुंबीय व अॅड. प्रशांत घरोटे, पोवनीचे उपसरपंच सरला विजय फुलझेले, सुधाकर चंदनखेडे, प्रदीप बोबडे उपस्थित होते.

स्वित्झर्लंडमध्ये होणार स्वागत समारंभलवकरच मिनल आणि डायना हे दोघेही स्वित्झर्लंड येथील जिथे त्यांचे वास्तव्य आहे, त्या ज्युरीक शहरात परत जाणार आहेत, तिथे डायना हिच्या कुटुंबीयांकडून स्वागत समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिनल फुलझेले यांनी दिली. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर