शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय"; कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरुन CM फडणवीस भडकले
2
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
3
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
4
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
6
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
7
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
8
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
9
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
10
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
11
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
12
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
13
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
14
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
15
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
16
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
17
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
18
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
19
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
20
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!

या शांताराम बापूंना मानावेच लागेल!

By admin | Updated: February 3, 2017 01:07 IST

चंद्रपूरला सांस्कृतिक चेहरा देण्यात ्रज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यात अग्रणी आहेत माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री

मानाचे मोठे आयोजन : चंद्रपूरला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलवसंत खेडेकर  बल्लारपूरचंद्रपूरला सांस्कृतिक चेहरा देण्यात ्रज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यात अग्रणी आहेत माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे अर्थात शांताराम बापू ! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माण करणारे चित्रपती व्ही. शांताराम (शांताराम बापू) यांना जशी कलेची जाण आणि आवड होती, तशीच आवड व जाण शांताराम पोटदुखे यांनाही आहे. ही त्यांची राजकारणात येण्यापूर्वीपासून आहे. त्यांच्या पुढाकाराने राजकारणाशी संबंध नसताना चंद्रपूर येथे जानेवारी १९७९ ला ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्युबिली हायस्कूलच्या पटांगणावर झाले होते. ते त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्याचे यशस्वी आयोजन त्यांनी (सोबतीला मदनराव धनकर) केले होते. हा मान त्यावेळी चंद्रपूरला शांतारामजींच्या प्रयत्नाने मिळाला होता.त्यानंतर ते राजकारणात गेले. चारदा खासदार बनून केंद्रात राज्यमंत्री झाले. परंतु, समाजकारण व सांस्कृतिक कार्य त्यांनी बंद केले नाही. राजकारणातून अंग काढल्यानंतर तर त्यांची या कार्यात अधिक रूचि वाढली आणि त्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमित होत असते. कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला असो वा कुणी दुसऱ्यांनी, त्या कार्यक्रमात अतिथी वा प्रेक्षक म्हणून त्यांची उपस्थिती ठरलेलीच! या असल्या कार्यक्रमांकरिता त्यांच्या सरदार पटेल महाविद्यालयाचे द्वार नेहमी उघडे ! त्याचे कारण शांतारामजींची या क्षेत्रात असलेली आवड आणि या क्षेत्रात जिल्ह्यातील कलावंत पुढे जावेत, सांस्कृतिक चळवळ नित्य सुरू राहावी ही त्यांची तळमळ! मराठी साहित्य संमेलन घेणे सोपी गोष्ट नाही. ही जबाबदारी त्यांनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ८५ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडले. आठवणीत राहावा, असा तो साहित्य मेळावा होता. याचे संपूर्ण श्रेय शांताराम बापूंना जाते. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्यातील कलेविषयीचा दांडगा उत्साह प्रेरणादायी आहे. फिल्म फेस्टिव्हल बहुधा मुंबई, पुणे, गोवा अशा ठिकाणीच होत असतात. तो शांताराम बापूंच्या पुढाकाराने व प्रयत्नाने चंद्रपूरला होणार आहे. फिल्म डिव्हिजन, माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने तो १४ फेब्रुवारीला होत आहे. चंद्रपूरला केवढा हा मोठा मान आणि किती महत्त्वाचे आहे आयोजन! यात दिग्दर्शक जब्बार पटेल फिल्म मेकिंगचे धडे देणार असून प्रख्यात छाया चित्रकार ए. एस. एच. खान हे चित्रिकरणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी माहिती चित्रपट दाखविले जातील. फिल्म मेकिंग काय असते आणि फिल्म फेस्टिव्हल कसा करतो, हे या आयोजनातून जिल्ह्यातील रसिकांना-तरुणांना बघायला मिळणार आहे. या आयोजनात शबाना आजमी, ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ख्यातीप्राप्त दिग्दर्शक अडूर गोपालकृष्ण्न हजेरी लावणार आहेत. हे आयोजन शांताराम बापूंच्या पुढाकाराने होत आहे. त्यामुळे, चंद्रपूरच्या या कलासक्त शांताराम बापूंना मानावेच लागेल!