शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

सावली शहर खादी चळवळीची माऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:17 IST

सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक आठवणींचे स्मरण : नवीन पिढीवर ग्रामोद्योग संस्काराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची अनुभूती येईल. येथील ८२ वर्षांच्या राजाबाळ संगीडवार यांनी येथील तेजस्वी इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. इतिहासाची माहिती देताना संगीडवार म्हणाले, कार्यालयाच्या समोर तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाला. गांधीजींसोबत सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेते या काळात सावली येथे मुक्कामी होते. चरखा संघाच्या प्राचीन वास्तूमध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर ‘खेड्याकडे चला’ हा नारा का दिला हे लक्षात आले. दोनशे चरख्यांवर काम करणारे शेकडो हात आजही सावली येथे सूत कताई करतात. चरखा संघात महिला- पुरूष सूत काततात. सुतापासून उत्तम प्रतीची खादी तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. १०० वर्षांपासून सूतकताई व खादी तयार करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ऊर्जा देणारी चळवळखादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सावलीला भेट दिली. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्मा गांधींंच्या दोन भेटीमुळे. गांधीजी १४ नोव्हेंबर १९३३ आणि २७ फेब्रुवारी १९३६ या दिवशी सावली येथे आले होते. २७ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. सात दिवसांत सावली ही देशाची राजकीय राजधानी झाली. चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. अनेक इमारती वैभवशाली इतिहास मूकपणे सांगतात. जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ व स्वावलंबत्वाची मशाल या चरख्यामध्ये पेटत होती, हेही लक्षात येते.