शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावली व कावळगोंदी येथे आगीत तीन घरे जळाली

By admin | Updated: May 24, 2017 02:11 IST

आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क सावली/राजुरा : आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले. त्यामध्ये घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कावळगोंदीत आगामुळे जनावरांचे दोन गोठेही जळाले. सावली येथील वार्ड क्र. १३ च्या सावित्रीबाई फुले चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. त्यामध्ये आबाजी कावळे यांचे घर, गोठ्यातील साहित्य व एक वासरू भाजले. ही आग पसरल्याने पत्रू रघुनाथ लेनगुरे यांचे घर, अंगणातील धानाचे १७ पोते जळाले. गुलाबशाह बाबा कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या तणासाच्या ढिगाऱ्याजवळ विद्युत तारा एकमेकांना घासल्या जाऊन ठिणगी निघाली. जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागली. आबाजी वारलू कावळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आग विझविण्यासाठी पाण्याच्या बादल्या घेऊन बालके व वयोवृद्ध नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर आग पसरत पत्रू रघुनाथ लेनगुरे यांच्या घराला लागली. त्यात त्यांची धानाची २५ पोती जळाली. तसेच त्यांच्या घराची पूर्णत: नुकसान झाले. त्यांच्या घरामागे असलेला गोठाही जळून खाक झाला. त्या आगीचा भडका अतुल लेनगुरे, विवेक लेनगुरे यांचा घरापर्यंत पोहोचला. मूल येथून अग्निशमन दलाचे वाहन बोलविण्यात आले. राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथील रवींद्र राठोड यांच्या घराला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. यावेळी त्यांच्या घरातील फ्रीज, टी. व्ही., कुलर, कपडे, धान्य आदी सर्व साहित्य जळाले. आगीमुळे राठोड यांना दुसऱ्याकडे आश्रय घ्यावा लागला. गुरांचा चारादेखील जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच कावळगोंदीचे उपसरपंच बाबाराव जाधव, राजुरा येथील कैलास कार्लेकर यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. परंतु तोपर्यंत घर पूर्णपणे जळाले. या आगीत गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तलाठ्याने गावात येऊन घटनेचा पंचनामा केला.