लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बल्लारपूर तालुक्यात असलेल्या कळमना येथील एका स्क्रब गोडाऊनला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण स्वरुप धारण केले व तीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या गोडाऊनलगत असलेल्या कापसाच्या शेतालाही आग लागून बराचसा कापूस भस्मसात झाला. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.या गोडाऊनमध्ये जनरेटर, पंप, मशीन्स असा बराचसा माल साठवून ठेवला होता. बुधवारी रात्री १० च्या सुमारास या गोडाऊनमधून आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गोडाऊनच्या मालकाला कळवले. अग्निशमनाचे पथक घटनास्थळी पोहचले मात्र आगीने रौद्र रुप धारण केले होते. पाहता पाहता हे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. गोडाऊनचे मालक शेख बब्बुभाई यांनी सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. या गोडाऊनमध्ये दिवसा सुमारे ४०-४५ मजूर काम करीत असतात.या गोडाऊनलगत असलेल्या कापसाच्या शेतात आग पसरून शेताचा बराचसा भाग त्यात भस्मसात झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात स्क्रब गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 10:50 IST
बल्लारपूर तालुक्यात असलेल्या कळमना येथील एका स्क्रब गोडाऊनला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण स्वरुप धारण केले व तीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात स्क्रब गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही
ठळक मुद्देआगीचे कारण कळले नाहीदोन कोटींच्या नुकसानाचा अंदाज