शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सात जणी लढल्या, एकच जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:47 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.

ठळक मुद्देचंद्रपूर लोकसभा मतदार संघ : महिला नेतृत्त्वाकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९६४ आणि १९६७ या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा गोपिकाताई कन्नमवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. १९६४ मध्ये झालेली पोटनिवडणूक त्या जिंकल्या आणि या मतदार संघाच्या पहिल्या महिला उमेदवार होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर १९६७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हे विशेष.१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लाल श्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व आदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्या निर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. ही बाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा मंजूर झाला. यानंतर १९६४ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयी झाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.यानंतर आजवरी अन्य सहा महिलांनी लोकसभा निवडणूक लढली. यामध्ये १९८० मध्ये जेएनपी(एस) कडून प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ मध्ये जयश्री इंगळे (अपक्ष), १९८९ मध्ये उर्मिला बलवंत पाठक (डीडीपी), १९९१ मध्ये ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष), १९९६ मध्ये सत्यशिला रायपुरे (अपक्ष) व २००४ मध्ये तायरा छोटु शेख (अपक्ष) या महिला निवडणूक लढल्या मात्र यात त्यांना यश आले नाही.महिला उमेदवार१९६४ - गोपिकाताई कन्नमवार (भाराकाँ) - विजयी१९८० - प्रतिमा नुरुद्दीन (जेएनपी(एस) - पराभूत१९८४ - जयश्री इंगळे (अपक्ष) - पराभूत१९८९ - उर्मिला बलवंत पाठक(डीडीपी) - पराभूत१९९१ - ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष) - पराभूत१९९६ - सत्यशिला रायपुरे (अपक्ष) - पराभूत२००४ - तायरा छोटु शेख (अपक्ष) - पराभूत