लसीकरणासाठी सात किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:47+5:302021-05-07T04:29:47+5:30
मूल तालुक्यातील गोवर्धन येथे इंंग्रज काळापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अस्तित्वात आहे. लाखो रुपये खर्च करून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात ...
मूल तालुक्यातील गोवर्धन येथे इंंग्रज काळापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अस्तित्वात आहे. लाखो रुपये खर्च करून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली. परंतु, येथे वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी उपकेंद्रात येत नसल्याने ही वास्तू शोभेची ठरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी येथील रुग्णांना खासगी डॉक्टरकडून उपचार घ्यावा लागतो. कोविडसाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे; परंतु गोवर्धन येथे लसीकरण केंद्र नाही. परिणामी नागरिकांना बेंबाळ किंवा मूल येथे जाऊन लसीकरण करावे लागते. लॉकडाऊनमुळे दळणवळणाची साधने बंद आहेत. परिणामी नागरिकांना ४५ अंश तापमानात लसीकरणासाठी पायपीट करावी, लागत आहे. त्यामुळे गोवर्धन उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, तसेच गावातील आरोग्याच्या समस्या दूर करण्याकरिता नियमित एका डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी मागणी ग्रा. पं. सदस्य काजूल लाकडे यांनी केली आहे.