शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

काँग्रेसच्या धानोरकरांपुढे आव्हानांची श्रृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:31 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी चर्चा सुरू असली तरी हे समीकरण विजयासाठी पुरेशे नाही, असाच आजवरचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो.

ठळक मुद्देचंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : वणी, आर्णीत कसोटी, काँग्रेसविरोधी वक्तव्येच अडचणी वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी चर्चा सुरू असली तरी हे समीकरण विजयासाठी पुरेशे नाही, असाच आजवरचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो. एकेकाळी गड असलेल्या काँग्रेसला या मतदारसंघात पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. अशातच आता आजपर्यंत कॉग्रेसवरच टिकेची झोड उठविणाऱ्या धानोरकर यांना काँग्रेसने ऐनवेळेवर उमेदवारी देऊन मागील पराभवापासून काहीही धडा घेतला नसल्याचेच दिसते. काँग्रेमधील गटबाजी, अपेक्षित, मात्र न चालणारे कास्ट फॅक्टर, दुखावलेला तेली समाज आणि आजवर केलेले काँग्रेसविरोधी वक्तव्य हे धानोकरांचे पाय ओढण्यास कारणीभूत ठरणार, असे दिसून येते.शिवसेनेपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या धानोरकरांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. मात्र कास्ट फॅक्टर या एकाच निकषावर उमेदवारी मिळविलेल्या धानोरकरांसमोर विजयासाठी मोठी आव्हाने आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी देतानाच पक्ष पातळीवर मोठा कलगीतुरा रंगला. दिल्ली, मुंबईत चंद्रपूरच्या उमेदवारीवरून खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच उद्वेग व्यक्त केला. जिल्ह्यातील काँग्रेसचा दुसरा मोठा गट नाराज असून आपण आयतेच भाजपा उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ तर टाकत नाही ना, अशी भीती काँग्रेसच्या गोटात होत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून जातीय समिकरणे जय-पराजयासाठी कधीच प्रबळ ठरली नाहीत. विविध जाती समुहातील समाजघटकांनी आपापल्या न्याय मागण्यांसाठी राजकीय पक्ष व नेत्यांना काही निर्णय घेण्यास बाध्य केले, एवढे मात्र खरे. उलट अल्पसंख्याक समाजासोबतच बहुजन समाजातील सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाला दिल्लीत पाठविण्यासाठी मतदारांनी पाठिंबा दर्शविला. आदिवासी, ब्राह्मण, व मुस्लिम समाजातील नेत्यांनाही चंद्रपूर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तत्कालिन राजकीय परिस्थितीत जातीय आणि धार्मिक घडामोडींनी नवनव्या चर्चांना व वादांना तोंड फोडले होते. परंतु जात अथवा धर्म या एकाच निकषाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, तत्कालीन जनसंघ म्हणजे आजचा भाजप आणि अपक्षामधून उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याची उदाहरणे नाहीत.११ एप्रिलला होऊ घातलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. चंद्रपूर मतदार संघात काँग्रेस सातत्याने पराभुत होत असल्याने यावेळी उमेदवारी कुणाला मिळणार, यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. दिवसागणिक वेगवेगळ्या व्यक्तींची नावे उमेदवार म्हणून पुढे येऊ लागल्याने मोठी उत्कंठा वाढली. दरम्यान, जातीय समीकरणांनाच आधार मानून काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली. बांगडे यांचे नाव जाहीर होताच आपल्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले म्हणून तेली समाज आनंदी झाला होता. दुसरीकडे या नावामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. काँग्रेसच्या दुसºया गटाने बांगडे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवित दिल्ली दरबारी जोरदार फिल्डींग लावली. यामुळे काँग्रेस हायकमांडही दबावात आल्याचे दिसून आले. कारण दोन दिवसातच काँग्रेसने उमेदवारीत अचानक बदल करून शिवसेनेचे माजी आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावानांमध्ये दुफळी निर्माण झाली. शिवाय बांगडे यांना उमेदवारी बहाल करून ती ऐनवेळी रद्द केल्याने तेली समाज दुखावला. या समाजाने जाहीररित्या काँग्रेसविरुध्द निर्दशने करीत आपला पाठिंबा काढून घेतला.धानोरकर हे स्वत:ला शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मानत राजकारणात सक्रिय होते. मात्र प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने व सत्तेचा मोह आवरता न आल्याने त्यांनी शिवसेनेलाही दूर केले. आमदारकीचा राजीनामा देऊन आठवड्याभरातच काँग्रेसशी घरोबा केला. शिवसेनेतून बाहेर पडताना आपल्या मागे कार्यकर्त्यांचा फौजफाटा येईल, असे धानोरकरांना वाटत होते.मात्र शिवसेनेचे पदाधिकारी व धानोरकरांच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण शिवसेनेत कायम असल्याचे स्पष्ट करून टाकले. या राजकीय घडामोडीने ऐन निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसमध्ये आलेल्या धानोरकरांना कास्ट फॅक्टर, काँग्रेसची गटबाजी, दुखावलेला तेली समाज आणि काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या छुप्या विरोधाचा मोठा सामना करावा लागणार आहे.शिवसेनेचे विचार स्वार्थासाठी भात्यातयवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभा मतदार संघात धानोरकरांना चांगलीच ताकद लावावी लागणार आहे. शिवसेनेत असताना कॉंग्रेसच्या धोरणावर घणाघाती टीका करत विधानसभेची निवडणूक लढविणाºया बाळू धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला खरा, पण शिवसेनेच्या विचारांचा बाण भात्यात ठेवून कॉंग्रेसचे विचार आणि ध्येयधोरणे त्याच त्वेषाने लोकांपर्यंत ते पोहचविण्यात किती यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत असताना त्यांनी कायम कॉंग्रेसवर टीका केली. आता त्यांच्यावर कॉंग्रेसचे गुणगाण गाण्याची वेळ आली आहे. त्यांची ही बदललेली भूमिका मतदार स्वीकारतील का, असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.काँग्रेसचे निष्ठावंत ‘आयात’ उमेदवाराचे काम करतील कसे?मागील लोकसभा निवडणुकीत वणी व आर्णी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हंसराज अहीर यांना विक्रमी मते मिळाली होती. याला मोदी लाटदेखील कारणीभूत होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी तुल्यबळ उमेदवारच नसल्याने कॉंग्रेसला बाळू धानोरकर यांच्या रुपाने ईतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. विधानसभा निवडणुकीत ज्या धानोरकरांनी कॉंग्रेसच्या ध्येयधोरणावर कडाडून टीका केली, त्याच कॉंग्रेससाठी त्यांना आता मते मागावी लागत आहे. एकूणच या निवडणुकीत पक्षांतराचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.