शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धानाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: December 11, 2014 23:05 IST

भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी

मोहाळी (नलेश्वर) : भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भाजप सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून आता धानाच्या राशी घरी येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अ दर्जाचे धान दोन हजार ते २१०० रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. गत वर्षी तीन हजार रुपयांपर्यत धानाचे दर वाढले होते. मात्र, यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ परिस्थिती, धान पिकांवर विविध रोगाची साथ व सततची नापिकी यामुळे धान उत्पादक शेतकरी वैतागलेला असताना, धानाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी पुर्णता खचला आहे. मात्र लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेतेमंडळी स्थिर सरकार बनवण्याच्या व एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे संबोधल्या जाते. शेतकरी सुखी तर जग सुखी असेही म्हटल्या जाते. मात्र, आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव बघितले तर जगाचा पोशिंदा खरोखरच सुखी आहे काय? याचा विचार न केलेला बरा. शेतकऱ्यासारखा कर्जबाजरी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलित जन्म घेतो व कर्जाच्या दलदलित मरतो, हे खर वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दिवसेंदिवस बी-बियाणांचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशकांचे भाव गगणाला भिडणारे, दिवसेंदिवस उत्पादनात घट तर कधी नापिकी, कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट, कधी उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगाची साथ या सर्व कालचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतात राबतो. पण त्याच्या नशिबी कुठले सुख आले. उलट दु:खाचे व कष्टाचे तसेच कर्जाचे डोंगर उभे आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर शासनाने वेळीच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अन्यथा आत्महत्या थांबणार नाही. (वार्ताहर)