बल्लापुरातील ऐतिहासिक किल्ला ठरतो सेल्फी पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:25 AM2021-01-18T04:25:08+5:302021-01-18T04:25:08+5:30

आजच्या आधुनिक युगात नवनवीन पद्धत लगेच चलनात येते. सोशल मीडियामुळे याचा प्रसार अधिकच झपाट्याने होतो. सध्या सगळीकडे लगनसराईची धामधूम ...

Selfie Point is the historical fort in Ballapur | बल्लापुरातील ऐतिहासिक किल्ला ठरतो सेल्फी पॉइंट

बल्लापुरातील ऐतिहासिक किल्ला ठरतो सेल्फी पॉइंट

Next

आजच्या आधुनिक युगात नवनवीन पद्धत लगेच चलनात येते. सोशल मीडियामुळे याचा प्रसार अधिकच झपाट्याने होतो. सध्या सगळीकडे लगनसराईची धामधूम आहे. कोरोनामुळे बरेचसे लग्न समोर ढकलण्यात आले. कोरोनाचा कहर बऱ्याच प्रमाणात मंदावला आहे. जीवनमान पूर्व पदावर येत आहे. लग्न समारंभात परत आधी एवढी गर्दी दिसू लागली आहे. लग्न सोहळा असला म्हणजे फोटो, व्हिडीओ शूट आलेच, आधी हे फोटो शूट फक्त साक्षगंध व लग्न सोहळ्यात वायचे, परंतु अलीकडच्या काळात यात तरुण पिढीने पारंपरिक पद्धतीला बदलत त्यात प्री वेडिंग शूट (लग्नापूर्वीची फोटोग्राफी) हा नवीन प्रकार अंगीकारला आहे आणि हा प्रकार झपाट्याने प्रचलित होत आहे.

एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारा व ऐतिहासिक स्थळी जाऊन हा फोटो शूट केला जातो. महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहे. मात्र, बल्लारपूर याला अपवाद आहे. हा परिसर आद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास निसर्गरम्य ठिकाणचा अभाव आहे. त्यामुळे प्री वेडिंग शूट करता, येथील गोंडकालीन किल्ला लोकांची पहिली पसंद ठरत आहे. अगदी अलीकडे येथील मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी किल्ल्याची सफाई अगदी तीन दिवसात पूर्ण केली. त्यामुळे सध्या किल्ल्याच्या परिसरात रोज प्री वेडिंग शूट करताना नवीन जोडपे दिसून येतात.

Web Title: Selfie Point is the historical fort in Ballapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.