शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट भोजन पाहून ३० विद्यार्थी धडकले आमदारांच्या निवासस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:38 IST

शासकीय वसतिगृहातील घटना : आमदारांनी गृहपालांना धारेवर धरत केली भोजनाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत संचालित चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा आरोप करून ३० विद्यार्थी चक्क आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी रात्री धडकले. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरत सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. 

शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ सामाजिक न्याय विभागाद्वारा शासकीय वसतिगृह संचालित केले जाते. मंगळवारी रात्रीचे भोजन निकृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या गृहपालांकडे केली. परंतु त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थी रात्री १०:३० वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी धडकले. तेव्हा आमदार जोरगेवार हे निवासस्थानी नव्हते. तोपर्यंत विद्यार्थी तिथेच थांबले होते. ग्रामीण भागाचा दौरा आटोपून रात्री निवासस्थानी पोहोचताच विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. विद्यार्थी उपाशी असल्याचे लक्षात येताच आमदार जोरगेवार यांनी सर्वांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. वसतिगृहाच्या गृहपालांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून धारेवर धरले व विद्यार्थ्यांना नियमानुसार, उत्तम दर्जाचे भोजन देण्याचे निर्देश दिले. भोजन केल्यानंतर हे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात परत गेले. 

असा आहे विद्यार्थ्यांचा आरोपवसतिगृहातील रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्याने आम्ही उपाशी होतो. आमच्यातील एकाने तक्रार करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे जाण्याचे सुचविले. आम्ही रात्रीच पत्ता शोधत त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो, मात्र ते घरी नसल्याने तेथेच वाट पाहत बसलो. ते आल्यावर घडलेला प्रकार सांगून कारवाईची मागणी केली. त्यांनी कारवाई करूच; पण प्रथम तुम्ही जेवण करून घ्या,' असे म्हणत आपल्या स्वीय सहायकांना सांगून जेवणाची सोय करून दिली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे

"शासकीय वसतिगृहातील भोजन दर्जेदारच असते. भोजनाची वेळ टळून गेल्यानंतर काही विद्यार्थी उशिरा रात्री वसतिगृहात दाखल झाले. त्यावेळी स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची सुट्टी झाली होती. विद्यार्थ्यांना समज देऊन भोजनाच्या व्यवस्थेची तयारीही करता आली असती. विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेगळा मार्ग निवडला. आता सर्व विद्यार्थी वसतिगृहात आले असून, सर्व सुरळीत आहे. याबाबत गृहपाल व संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. "- बाबासाहेब देशमुख, आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, चंद्रपूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर