शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपावर बियाण्यांचा आघात

By admin | Updated: May 12, 2014 23:26 IST

मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे.

रवी जवळे - चंद्रपूर

मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे. मात्र या बळीदादांच्या खरीपांवर आता बियाण्यांचे संकट घोंगावत आहे. हा नवा आघात त्यांना प्रारंभीच सहन करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या अतवृष्टीत महाबीजचे सोयाबीन प्लांट उद्ध्वस्त झाल्याने सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई जाणवणार आहे. शेतकर्‍यांच्या सोयाबीनला चक्क अंकुर फुटल्यामुळे त्यांच्याही हाती बियाणे नाही. त्यामुळे बियाणे आणायचे कुठून, या जटील प्रश्नाची उकल कृषी विभागासोबत शेतकर्‍यांनाही करावी लागणार आहे.

मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये अतवृष्टी झाली. यात शेतकर्‍यांच्या अनेकदा पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकर्‍यांना वेळ निघून गेल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या करताच आल्या नाही. काही शेतकर्‍यांच्या पेरण्या तग धरून राहिल्या. मात्र सोयाबीन हाती येत असताना पुन्हा पाऊस आला. त्यानंतर कापणी सुरू असताना पुन्हा एक महिना संततधार पाऊस बरसल्याने सोयाबीनचा दाणा सुकू शकला नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अंकूर फुटले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जवळजवळ ९0 टक्के शेतकर्‍यांजवळ सोयाबीनचे बियाणे शिल्लक नाही. ज्या शेतकर्‍यांनी विलंबाने पेरणी केली किंवा ज्यांनी रबी हंगामात सोयाबीन पेरला, त्यांच्याजवळ बियाणे म्हणून वापरायला सोयाबीन शिल्लक असेलही; मात्र असे शेतकरी १0 टक्केच आहेत.

खास सोयाबीनच्या बियाणांसाठी शासनाच्या वतीने तयार करण्यात येत असलेले महाबीजचे प्लांटही अतवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या ठिकाणीही सोयाबीन बियाणांची प्रचंड टंचाई आहे. महाबीजचेच प्लांट उद्ध्वस्त झाल्याने ही टंचाई राज्यभरच जाणवणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनबाबत खुद्द राज्याचा कृषी विभागाच चिंतेत आहे.

सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. लग्नसराईला बगल देत शेतकर्‍यांचीही शेतात लगबग सुरू झाली आहे. मात्र बियाण्यांबाबत कृषी विभागाच्याच हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे व्यापार्‍यांनी मार्केटमध्ये सोयाबीनचे बियाणे उपलब्ध केले आहे. मात्र बियाणांच्या किमती शेतकर्‍यांच्या फाटक्या झोळीला पुन्हा फाडणार्‍या आहेत. मागील वर्षी एक एकरला पुरेशी असलेली ३0 किलोची बॅग १५00 ते १८00 रुपयापर्यंत विकण्यात आली होती. तीच बॅग यावर्षी प्रारंभीच २२00 ते २८00 रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्यक्षात पेरण्या होईपर्यंत सोयाबीन बियाणे प्रति बॅग तब्बल साडेतीन हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सोयाबीन बियाणांच्या किमती निर्धारित केल्या नसल्यामुळे यंदा शेतकर्‍यांची लूट निश्‍चित आहे.एवढे महाग बियाणे असले तरी त्यात उगवण क्षमता असेलच याची गॅरंटीही नाही. विशेष म्हणजे, राज्यातच अतवृष्टी झाल्यामुळे हे बियाणे आंध्र प्रदेशातून आणले जात असल्याची माहिती आहे.