शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सव्वा लाख नागरिकांची सुरक्षा केवळ १०० पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:04 IST

Chandrapur : अपुऱ्या मनुष्यबळावर बल्लारपूर ठाण्याचा कारभार

मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर: येथील पोलिस ठाण्यांतर्गत २२ गावांमधील सुमारे १ लाख २१ हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ १०० पोलिस अधिकारी, कर्मचारी सांभाळत आहेत. यामुळे सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शहर व गावांमध्ये सुरू असलेले जुगार, मटका, अवैध दारू, गौण खनिजांची वाहतूक रोखण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

सध्या ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक व ९० च्या जवळपास पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी ही संख्या अपुरी आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर अडचणींचा सामना पोलिस ठाण्याला करावा लागत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहराच्या महत्त्वपूर्ण चौकातून ट्राफिक पोलिस दिसेनासे झाले आहेत. पोलिस चौक्या बंद आहेत, त्या उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीची गस्त कमी प्रमाणात होते. पोलिसांची अपुरी संख्या असल्यामुळे पोलिसांना ठाण्यात जास्त वेळ द्यावा लागतो. बल्लारपूर पोलिस ठाण्यांतर्गत चार बिट, दोन आरोग्य व ग्रामीण रुग्णालय, सहा महापुरुषांचे पुतळे, १८ मशीद, १३ चर्च व ३१ मंदिरांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाण्यापासून २८ किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर असलेल्या हद्दीत २२ गावे आहेत. या गावांतील १ लाख २० हजार २६९ लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी जवळपास १०० पोलिस कर्मचारी पाहतात. उत्सवासाठी, गस्त घालण्यासाठी हे कर्मचारी कमी पडतात.

असे आहे पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ

पोलिस निरीक्षक १, सपोनि ३, पोउपनि ३. चालक ४, बिट जमादार ४, बिट मदतनीस ४, मोहरील १, हजेरी १, तसेच क्राइम, गुप्त वार्ता व वायरलेस १, उपविभागीय कार्यालय, राजुरा, कोर्ट-३.

आणखी ४३ कर्मचाऱ्यांची गरज अनेक वर्षापासून या पोलिस ठाण्याला लोकसंख्येनुसार मनुष्यबळाचा कोटा दिलेला आहे. तो अद्यापही कायम आहे. वास्तविक पाहता आजघडीला लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार कर्मचारी संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या तरी ४३ च्या वर पोलिस कर्मचारी गरजेचे आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा तनाव कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, त्याचा परिणाम शरीर प्रकृतीवर होत आहे. गेल्या एक वर्षापासून वरिष्ठांकडे पोलिस कर्मचारी वाढवून देण्याची मागणी होत आहे. परंतु, वाढीव पोलिस कर्मचारी अजूनपर्यंत मिळाले नाहीत.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर