शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांनी उलगडणार चंद्रपूर जिल्ह्यातील हिरव्या पाण्याचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:39 IST

कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही.

ठळक मुद्देरहस्य कायम नीरीनेही घेतले पाच ठिकाणावरील पाण्याचे नमुने

आशिष देरकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. अशातच मंगळवारी नागपूर येथील नीरीच्या चमूने पाहणी केली. धरणातील ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. मात्र या चमूनेही खरे कारण अद्याप स्वष्ट केले नसल्यामुळे हिरव्या पाण्याचे रहस्य कायमच आहे.अंमलनाला धरणाचे पाणी पूर्णत: हिरवे झाल्यामुळे शासनाने दखल घेत वेगवेगळ्या विभागाकडून पाण्याच्या तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. मंगळवारी नीरीच्या चमूने अंमलनाला धरणाचे निरीक्षण करून नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पाणी तपासून निष्कर्ष मिळेपर्यंत आठ दिवस लागणार आहे.नागपूरवरून आलेल्या या चमूत डॉ. जी. के. खडसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, बहादुले, सिंचन विभागाचे उपअभियंता ओचावार, कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे, राजूराचे तहसीलदार रवींद्र होळी, सिंचाई विभागाचे शाखा अभियंता सय्यद अमीर अली याचां समावेश आहे. सदर चमूने जवळपास चार तास अंमलनाला धरणाची पाहणी केली. पाच ठिकाणचे वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले. अंमलनाला धरणाच्या आजूबाजूच्या पाण्याचे स्त्रोत बघून त्याठिकाणी काही आक्षेपार्ह आढळते काय,याची सुद्धा पाहणी केली. मात्र असे काहीही आढळले नाही.सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर याकडे जिल्हा प्रशासनासह सर्वत्र खळबळ उडाली. जिल्ह्याचे पालकमंत्र सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत चौकशीचे आदेश देऊन पाणी हिरवे होण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.यानंतर शासनाच्या विविधपातळीवर चमू या धरणाला भेट देऊन पाहणी करीत आहे. मात्र रहस्य कायमच आहे.नीरीचे डॉ. खडसे यांच्या मतेघाबरण्याचे काहीही कारण नसून शेवाळामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीसाठी आतील पाणी सुद्धा घेण्यात आलेले आहे. चमूच्या माहितीनुसार आतील पाणी स्वच्छ असून शेवाळ वरती तरंगत असल्याचे दिसते. तसेच किनाऱ्यावर त्याचे जास्त प्रमाण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेवाळाचे अनेक प्रकार असून काही शेवाळ नुकसानकारक पण असतात. मात्र यामुळे माशांना कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे नीरीच्या चमूने स्पष्ट केले.पाणी हिरवे होण्यामागे शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती कारणीभूत आहे. परिसरातील शेतात टाकलेल्या रासायनिक खतांमधील सल्फेट व फॉस्फेट धरणाच्या पाण्यात मिसळल्याने या वनस्पतींना खाद्य मिळाले. अशातच सूर्यप्रकाशही मिळाला. यामुळे या वनस्पतीची गतीने वाढ झाली. ढगाळ वातावरणात असे झाले नसते. यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. या वनस्पतीचे पाण्यात अधिक प्रमाण असेल तर पाण्यातील आॅक्सिजन कमी होतो.- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोयायटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण