शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

चंद्रपुरात बॉम्बशोधक पथकाकडून सर्चिंग

By admin | Updated: August 15, 2015 01:18 IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढविल्यानंतर या घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता ....

याकूबच्या फाशीची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यदिनी घातपाताच्या शक्यतेने पोलीस सतर्क चंद्रपूर: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढविल्यानंतर या घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात पोलिसांनी सर्चींग आॅपरेशन केले. रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर शहरात ही मोहिम राबविण्यात आली. यासाठी वेगवेगळ्या १० पथकांचे गठण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या विविध पथकांनी शहरातील गर्दीची ठिकाणे, महत्वाच्या इमारती, धार्मिकस्थळे आदी ठिकाणांवर शोध मोहिम राबविली. या पथकासोबत बॉम्बशोध व श्वानपथक होते. केवळ चंद्रपुरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात हे सर्चींग आॅपरेशन राबविण्यात आले. (प्रतिनिधी)याकूब मेमनला फाशी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी देशभरात सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात गुरूवारी सर्चिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यापुढेही ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.-प्रल्हाद गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूरराष्ट्रीय सणाला धोका अधिकयाकूबला फासावर देण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांच्या हालचाली लक्षात घेता स्वातंत्र्यदिनी दहशतवाद्यांकडून घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिकच सतर्क झाले आहे. त्यामुळे गुरूवारी पोलिसांनी दिवसभर चंद्रपूर शहरासह जिल्हाभर सर्चींग आॅपरेशन राबविले. अफवांवर विश्वास ठेवू नकाकाही विघातक शक्तींकडून अफवा पसरविली जाण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एखाद्या ठिकाणी संशयास्पदस्थिती वस्तू दिसून आली तर नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याची तातडीने माहिती द्यावी. अशा वस्तुला कुणीही हात लावू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेच्यावतीने करण्यात आली आहे.