शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

तपोभूमीत लोटणार गुरुदेव भक्तांचा सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखले जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजांविषयी मोठे प्रेम आहे. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.

ठळक मुद्देआज गोपालकाला : विदर्भातील विविध ठिकाणाहून भक्त लावणार हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : समस्त मानवजातीला मानवतेचा संदेश देणारे तथा भजनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून क्रांती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ज्या भूमीत राष्ट्रसंतांनी साधना केली, त्याच गोंदेडा (गुंफा) भूमीत भरणाऱ्या यात्रेसाठी शुक्रवार १० जानेवारीला विदर्भातील गुरुदेव भक्तांचा सागर लोटणार आहे.अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखले जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजांविषयी मोठे प्रेम आहे. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.गोंदेडा (गुंफा) येथे राष्ट्रसंतांनी १९५९ ला घुगरी काला केला. नंतर महाराजांनी या भूमीत १९६१ ला पहिली यात्रा भरवली.तेव्हापासून अविरत ही यात्रा परिसरातील गुरुदेव भक्तांकडून भरविण्यात येते. या तीन दिवस चालणाºया यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी लाखो गुरुदेवभक्त श्रद्धेने गोंदेडा या गावात येऊन गुरुदेवापुढे नतमस्तक होऊन एक नवी ऊर्जा घेऊन जातात.१० जानेवारी ला आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील हजारोच्या संख्येने गुरुदेव भक्त गोंदोडयात दाखल होणार असून आयोजकांनी तयारी पूर्ण केली आहे.पोलिसांचा तगडा बंदोबस्तगोंदेडा येथे शुक्रवारी होणाºया गोपाल काल्यासाठी लाखो गुरुदेवभक्त तपोभूमी येथे येतात. या गुरुदेव भक्तांना त्रास होऊ नये व शांतता सुव्यवस्था राहावी, याकरिता १० अधिकारी व २७५ पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर ड्रोन कॅमेºयाद्वारे परिसरावर बारिक लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांनी दिली.चिमूर आगरातून जादा बसची व्यवस्थातपोभूमी गोंदेडा येथे येणाऱ्या गुरुदेवभक्तांसाठी चिमूर ते गोंदेडा अशी जादा बसची व्यवस्था रविवारपासून करण्यात आली असून या फेºया अर्ध्या-अर्ध्या तासाने व नागरिकांच्या गरजेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती चिमूरचे आगार व्यवस्थापक आर. एस. बोधे यांनी दिली.