शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

एसडीपीओच्या रायटर व अंगरक्षकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 16:04 IST

Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चंद्रपूर : राजुरा उपविभागीय कार्यालयातील एसडीपीओ राजा पवार यांचे रायटर व अंगरक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एसडीपीओ कार्यालय बाहेरील चहा टपरीवर रंगेहात अटक करण्यात आली.

रायटर राजेश त्रिलोकवार (५१) व अंगरक्षक सुधांशू मडावी (३६) असे अटकेतील पोलिसांचे नाव आहे. तक्रारकर्त्याला दारूची वाहतूक करताना राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या प्रकरणात मदत करण्यासाठी एसडीपीओचे रायटर त्रिलोकवार व अंगरक्षक मडावी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्याने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत विभागाकडे केली.

पथकाने सापळा रचून शुकवारी एसडीपीओ कार्यालयाच्या बाहेरील चाय टपरीवर दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली. यांच्या वाहनातून सुमारे अडीच लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे; ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक वर्षा मते, ना. पो. शि अनिल बाहरे, अमोल मेघरे, विकास गडपायले आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणchandrapur-acचंद्रपूर