शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मांजाने गळा कापला

By admin | Updated: January 13, 2017 00:33 IST

पतंगाच्या मांजाने विद्यार्थिनीचा गळा कापल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूस बायपास मार्गावरील

विद्यार्थिनी जखमी : रुग्णालयात उपचार सुरूचंद्रपूर : पतंगाच्या मांजाने विद्यार्थिनीचा गळा कापल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूस बायपास मार्गावरील जयश्रीया लॉनजवळील पुलाजवळ घडली. सुदैवाने तिचा जीव वाचला असला, तरी गंभीर जखमी झाल्याचे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सपना गयाप्रसाद सोनकर (२१) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. मांजाविक्रीवर बंदी असतानाही शहारात खुलेआम विक्री होत असल्याने प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे. महाकाली कॉलरी परिसरातील सपना सोनकर ही सरदार पटेल महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पोलीस विभागाच्या भरतीसाठी ती सध्या तयारी करीत आहेत. नेहमीप्रमाणे दुचाकीने ती जिल्हा क्रीडा संकुलावर धावण्यासाठी जात होती. रस्त्याने जात असताना एक तरुण जयश्रीया लॉनजवळील पुलावर पतंग उडवित होता. या पतंगाच्या मांजामुळे सपनाचा गळा कापला. त्यामुळे ती दुचाकीवरुन खाली कोसळली.यावेळी नागरिकांना घटनास्थळावर धाव घेतली. तातडीने रक्तस्त्राव थांबण्यासाठी स्कार्फ बांधला. त्यानंतर तिला डॉ. भुक्ते यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉ. मनीष मुंधडा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजामुळे गळ्याला खोलवर जखम झाली मात्र, ‘जुगुलर’ वाहिनीला जखमी झाली नाही. तसेच तातडीने उपचार केल्यामुळे तिचा जीव वाचला असल्याचे डॉ. मनीष मुंधडा यांनी सांगितले. नागरिकांनी मकरसक्रांतीच्या दिवसात पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा. मात्र नायलॉन, चिनी मांजाचा वापर करु नये, असे आवाहन डॉ. मुंधडा यांनी पत्रकारांशी बोलताना केले.