शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शिक्षण विभागात भरविली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:49 IST

शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोयी होत आहेत.

ठळक मुद्देआंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या गणवेशात : शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा विरोध

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोयी होत आहेत. शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात धडक देऊन तिथे प्रतिकात्मक शाळाच भरविली. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी अचानक एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे जि.प. वर्तुळात एकच खळबळ उडाली.कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून पालकवर्गही यामुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकाºयांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणाºया शासनाचा निषेध असो’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिक्षण विभागाचे कार्यालय दणाणून सोडले.यावेळी शिक्षणाधिकाºयानी मनसे पदाधिकाऱ्यांची म्हणणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. शाळा बंद करून त्याचे समायोजन करताना विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शाळेत जाणेही बंद झाले आहे, अशी माहितीही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द न केल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनदीप रोडे व आंदोलनकर्त्यांनी दिला. सदर आंदोलनात शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुक्तलवार, सचीन कोतपल्लीवार, सुमित खेडनकर, सुमित करपे, नितीन बावणे, नितीन कुमरे, नगाजी गंफाळे, राहुल मंडल, सतीश नैताम, प्रकाश कुमरे, राकेश चव्हाण, गितेश मडावी, सन्नी मंडल, अनिल हजारे, अजय मुक्तलवार, इरफान खान, दीपक दवारकर, रितेश मांडवकर, विपुल नांदेकर आदी सहभागी झाले होते.प्रश्नांची सरबत्तीशासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करते. शिक्षकांना भरमसाठ वेतन देण्यात येत असताना शाळेतील पटसंख्या कमी का होत आहे ? मोफत शिक्षण सोडून पैसे भरून विद्यार्थी खासगी शाळेकडे का जात आहे, यासारख्या प्रश्नांची सरबत्ती आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाºयांसमोर केली. दरम्यान, शिक्षण विभागावरील होणारा खर्चाचा योग्य ताळेबंद लावून त्याचा सदुपयोग करावा. जेणेकरून शासनावर शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवणार नाही, असे मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले.आंदोलनाने लक्ष वेधलेविद्यार्थ्यांच्या गणवेशात मनसे पदाधिकारी अचानक जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्ते शिक्षण विभागात पोहचून तिथे जमिनीवरच ठाण मांडले. हे आंदोलन जिल्हाभरातून जिल्हा परिषदेत येणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. दुसरीकडे अचानक झालेल्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी हादरून गेले होते.