शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनेक रूग्णालयात औषधांचा तुटवडा

By admin | Updated: July 22, 2016 01:06 IST

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ५३ आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधसाठाच नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

‘ओआरएस’ सप्ताहाचा विसर : चौकशी करण्याची अविनाश जाधव यांची मागणी राजुरा : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ५३ आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधसाठाच नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. सध्या पावसामुळे साथीचे रोग, मलेरिया, अतिसार, ताप, लहान मुलांचे आजार वाढले आहेत. मात्र यासाठी आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाही. सध्या ओआरएस सप्ताह सुरू असून गावामधील लहान मुलांना ओआरएसची पॉकिटे वाटप करावयाची होती. परंतु, आरोग्य विभागाला या सप्ताहाचा विसर पडला असून अजूनपर्यंत ओआरएसची पॉकिटे देण्यात आलेली नाही. अतिसंवेदनशिल प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली (बु.) येथीेल मलेरिया वर्कर गैरहजर असतात. मुख्यालयी राहत नाही. दोन वर्षांपूर्वी सुब्बई येथील एक्सपायरी झालेल्या गोळ्या लहान मुलांना वाटप करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील मुलाची प्रकृती नाजुक झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर उपकेंद्राला नियमित भेटी देत नाही. आरोग्य शिबिरे कादागवरच असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी असते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीही आरोग्यविषयक समस्यांबाबत गंभीर नाही. जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अ‍ॅन्टेबायटीक आयड्राप, सेप्ट्रान, पॅरासिटामील, अ‍ॅम्पीसिलन, ओआरएस, बॅन्डेज पट्टया यासह अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करून औषधांचा पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)