शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

स्कॅन केलेल्या नोटा बाजारात

By admin | Updated: February 18, 2017 00:38 IST

नोव्हेंबर महिन्यत चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

दुकानदारांमध्ये घबराट : संगणकाद्वारे हातचलाखी वरोरा : नोव्हेंबर महिन्यत चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्याऐवजी नवीन २ हजार रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या आहे. त्याचा फायदा घेत संगणकाने स्कॅनिंग केलेल्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये चालविल्या जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये व नागरिकांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे.सध्या २ हजार, ५००, १०० रुपयाच्या नोटांना नागरिक मोठ्या प्रमाणात वापरीत आहे. सध्या या नोटा नवीन असल्याने बनावट नोट ओळखणे सामान्य नागरिकांना कठीण जात आहे. मागील काही दिवसांपासून संगणकावरून स्कॅन केलेल्या २ हजार, ५०० व १०० रुपयांच्या नोटांनी चलनात शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. गर्दी असलेल्या दुकानात या नोटा चालविल्या जात असल्याचे समजते. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी चिल्लर घेवून स्कॅन केलेल्या नोटा दिल्या जात असल्याचे मानले जात आहे. संगणकावर स्कॅन केलेल्या नोटाचा कागदसुद्धा बनावट असल्याचे दिसून येते. एखाद्या विक्रेत्यास व नागरिकास संगणकावर स्कॅन केलेली नोट ग्राहकाकडून मिळाल्यास ती बँकेत जमा करताना घेतली जात नाही. त्यांच्यामागे तपासाचा ससेमीराही लागण्याची शक्यता असल्याने संगमक स्कॅन नोट चुकून आल्यास नागरिक व विक्रेते गप्प बसत आहेत. त्यामुळे संगणकृत स्कॅन नोटा चालविणाऱ्याचे फावत आहे. (तालुका प्रतिनिधी)स्कॅन नोटेवर गांधीजींचे छायाचित्र नाही संगणकावरून स्कॅन करून चलनात आणलेल्या नोटेवरील पांढऱ्या रंगात महात्मा गांधीचे छायाचित्र दिसत नाही. स्कॅन नोटेचे सुक्ष्म अवलोकन केले असता अनेक तफावती आढळून येत आहे. परंतु गर्दीमधून रक्कम घेताना नोटा बारकाईने बघता येत नसल्याने संगणकावरील स्कॅन केलेल्या नोटा चलनात आणण्याची हिंमत दिवसागणिक वाढत आहे. २०१४ मधील दोन्ही नोटांमध्ये तफावत२०१४ मधील दोन नोटा पाहिल्या असता संगणकावर स्कॅन केलेल्या नोटेवर सुब्बाराव आणि खऱ्या १०० च्या नोटेवर गर्व्हनर रघुराम जी. राजन यांचे नाव व स्वाक्षरी असल्याचे दिसून येते.