शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीचे जतन करा : सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:57 IST

संकट आले तर महिलांनी मागे वळायच नाही. धैर्याने उभे रहा. मुलींनो संपूर्ण कपडे घाला, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माय आठवली पाहिजे.

आॅनलाईन लोकमतब्रह्मपूरी : संकट आले तर महिलांनी मागे वळायच नाही. धैर्याने उभे रहा. मुलींनो संपूर्ण कपडे घाला, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माय आठवली पाहिजे. सावित्री, जिजाऊ, सिंधुताई नववारीत अन् तुम्ही दोनवारीत, असे चालणार नाही. महाराष्ट्रात माती, निती, अन् संस्कृती हातात हात घेऊन चालते, असे भावनिक आवाहन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले. त्या ब्रह्मपुरी महोत्सवात ‘काळजातील माय’ या कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी मंचावर आ. विजय वडेट्टीवार, किरण वडेट्टीवार, प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, मारोतराव कांबळे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, रश्मी पेशने उपस्थित होते. यावेळी देशासाठी शहिद झालेल्या प्रफुल्ल मेहरकर यांच्या वीर मातापित्याचा सिंधुताईच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परिसरातील शेकडो महिलांनी गर्दी केली होती.यावेळी अनेकांनी अनाथाच्या मायी सिंधुताई सपकाळ यांना सढळ हाताने मदत केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमीर धमानी तर आभार डॉ. मोहन वाडेकर यांनी मानले. ब्रह्मपुरी महोत्सवात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात असून परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती आहे.आरोग्य शिबिराचा लाभ घ्या : विजय वडेट्टीवारजनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जनसेवेच्या माध्यमातून महिला-पुरुष वर्गाचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरिता ब्रह्मपुरी महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, माजी नगराध्यक्ष वनिता ठाकूर, नगरसेविका प्रतिमा फुलझेले, योगिता आमले उपस्थित होत्या. या शिबिरात तज्ञ डॉक्टरच्या हस्ते जवळपास १००० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रितमकुमार खंडाळे, डॉ. शेख, डॉ. सतीश मेंढे, डॉ. भारत गणवीर व अन्य कर्मचाºयांचा सहभाग होता.