शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाचा खर्च वाचणार; महिला तसेच गरीब गरजूंना मोफत वकील मिळणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:07 IST

विधि सेवा प्राधिकरण : पीडित शोषित महिलांसह गरजूंना मिळतो सेवेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोर्टाची पायरी चढावी लागलेल्या अनेकांना वकील नेमण्याचा खर्चही परवडत नाही. अशा गरजू आणि गरीब नागरिकांना विधि सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील सेवा पुरविण्यात येते. मात्र, याबाबत अनेकांना माहितीच नसल्याने या सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत असल्याचे दिसून येतात.

कोर्टातील केसेसमध्ये अनेकदा पक्षकारांना वकील नेमावा लागतो. मात्र, गरजू आणि गरीब लोकांना वकील नेमण्याचीही ऐपत नसते. त्यामुळे अनेकजण कारागृहात लटकून असतात. परंतु, गरजूंना न्यायासाठी विधि सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील सेवा देण्यात येते. त्यांना अनेकांना फायदा होतो.

कोणाला मिळतो मोफत सरकारी वकील ? मोफत कायदेशीर मदतीसाठी अनु. जातीचा किंवा अनु. जमातीचा सदस्य घटनेच्या अनुच्छेद २३ मध्ये उल्लेखित मानवी तस्करी किवा सक्तीच्या मजुरीचे बळी, कोणतीही स्त्री किवा मूल, शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती, मनोरुग्ण किवा दिव्यांग व्यक्ती, जातीय हिंसा पीडित व्यक्ती आदींना विनामूल्य न्याय मिळवू शकतो.

माहितीअभावी अत्यल्प जणांनी घेतला लाभ गरजूंना मोफत वकील मिळत असतो, याबाबतची माहिती नाही. त्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. जनजागृती करणे गरजेचे आहे.

विधितज्ज्ञ म्हणतात... "प्रशासन व न्यायपालिकेतर्फे मोफत विधि सल्ला पुरवण्यासाठी विभाग असले तरी पक्षकार त्याचा लाभ घेण्याचे टाळतात. अनेक पक्षकार वकिलाचा सल्ला न घेता नातेवाईक व एजंट्सचे सल्ले घेतात. त्यामुळे न्यायपालिकाविरुद्ध संभ्रम निर्माण होतो. मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय येथील प्रतिष्ठित वकिलांची आणि मोठमोठ्या चेंबर्सची फिस ही सहजासहजी सामान्य जनतेस परवडणारी नसते. पक्षकारास भारताच्या संविधानावर विश्वास ठेवायला हवे. शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम आखणे गरजेचे असून सामाजिक संस्था व वकिलांनीदेखील काही प्रमाणात प्रो-बोनो केसेस चालवित सामाजिक दायित्व जपले पाहिजे. तरच, न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास वृद्धिंगत होईल." - अॅड. आशिष मुंधडा, विधितज्ज्ञ

 

टॅग्स :advocateवकिलchandrapur-acचंद्रपूर