शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:45 IST

इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देखोलीकरणाचे काम रखडले : इरई मातेसाठी निधी द्या हो !

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अर्धवट काम झाल्यामुळे पुन्हा इरई नदीची दुरवस्था होण्याची चिन्हे आहेत. इरईच्या खोलीकरणाचे काम पुन्हा सुरू करावे व नदीला वाचवावे, या मागणीसाठी इरई बचाव जनआंदोलन व वृक्षाईतर्फे गुरुवारी इरई नदी पदयात्रा व नदीपात्रातच बैठा सत्याग्रह करण्यात आला.वेकोलिचे महाकाय ढिगारे, विविध उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी यामुळे इरई नदी प्रदूषित झाली. तिचे नैसर्गिक पात्रच बदलले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.मागील वर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरूच करण्यात आले नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तरीही निधीअभावी हे काम बंदच ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पुन्हा हे काम बंदच ठेवावे लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, इरई नदीच्या खोलीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी वृक्षाई व इरई बचाव जनआंदोलन यांच्या वतीने गुरुवारी सकाळी इरई नदी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रात बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विविध भजने गाऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात कुशाब कायरकर, अनिता कथडे, रेखा चांभारे, गिता अत्रे, दीपलता कालीवाले, अर्चना बट्टे, संगिता देवतळे, रुपाली टोंगे, प्रिती लांडे, संगिता विधाते, कमल गोहणे, कुसूम झाडे, जोत्स्ना शेंडे, कविता टेकाम, सरिता वारदरकर, सुनिता कडूकर, शैलजा तिवारी, कविता चवरे, छाया ठोंबरे, शशिकला औऊतकर, आशा कायरकर, वंदना गोहणे, भूमी व प्रतिभा कायरकर, अनिल राईकवार, मयूर राईकवार, खुशाल लोंढे, तुकाराम झाडे, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे सहभागी झाले होते.आंदोलनाला पाठिंबाइरई नदीच्या खोलीकरणासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, संदीप कष्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, सुनिता अग्रवाल, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बैठा सत्याग्रहाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.