शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

सरपंच बनताच झाली अटक

By admin | Updated: September 10, 2015 00:47 IST

एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते.

मनरेगाव घोटाळा प्रकरण : नवनिर्वाचित सरपंचाला एकाच दिवशी पद व अटकब्रह्मपुरी : एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते. त्याचा प्रत्यय मालडोंगरी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आला. राजेश दामोधर पारधी यांना सरपंच होताच मनरेगा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली.मालडोंगरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ग्रामरोजगार म्हणून राजेश दामोधर पारधी कार्यरत होते. या योजनेमध्ये १ लाख ४ हजार ६३९ रुपयांची अफरातफर झाली असल्याचे चौकशी अंती उघडकीस आल्याने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार राजेश दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. अटकेचा दिवस व सरपंच पदाची निवड बुधवारीच झाली, हे विशेष. यापूर्वी पिंपळगाव (भो.) येथे ग्रामरोजगाराला अटक झाली होती. त्यानंतर मालडोंगरी येथे तसाच मनरेगा घोटाळा उघडकीस आला. मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण संपूर्ण तालुक्यातच लागल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागले आहे. असेच या प्रकरणावरुन दिसून येत आहे. राजेश दामोधर पारधी यांनी प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचे नाव नसणे, मस्टर अदलाबदल करणे, कामावर आपल्या हितसंबंधी लोकांना घेणे आदी व इतर कारणांची तक्रार पंचायत समितीमध्ये करण्यात आली. त्यानुसार संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्या चौकशीत सत्यता आढळून आल्याने फिर्यादी प्रकाश तोडेवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक लाख चार हजार ६३९ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार केली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी राजेश दामोधर पारधी रा. मालडोंगरी याला अटक करुन भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु आज मालडोंगरी येथील सरपंच पदाची निवडणूक होती. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश पारधी यांची पार्टी बहुमताने निवडून आली होती. त्यानुसार राजेश पारखीला सरपंचपदासाठी उभे करण्यात आले. एकीकडे गुन्ह्यात अटक तर दुसरीकडे सरपंचपदासाठी प्रक्रिया पूर्ण करणे असे दोन्ही प्रकार यावेळी गावकऱ्यांनी अनुभवले. प्रारंभी अटक करुन पुन्हा सरपंचपदाची उमेदवारी भरण्यासाठी नेणे, पुन्हा पोलीस ठाण्यात आणून पुन्हा मत टाकायला नेणे व सरपंच म्हणून निवड येणे असा प्रकार आज घडला. एकूणच हा प्रकार राजकारणाचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. राजेश पारधी हा काँग्रेस पार्टीकडून निवडून आला आहे. तर मनरेगामध्ये केलेला घोटाळा भाजपाने उघडकीस आणून दिलेला असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढे हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे सर्व तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)