चंद्रपूर : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट अंतर्गत फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या सरपंच संसदेत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलाविण्यात येणार आहे. या संसदेत जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले सहभागी होणार आहेत. एमआयटी महाराष्ट्र संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, प्रांत समन्वयक व्यंकटेश जोशी, नागपूर विभाग समन्वयक विनय दाणी व नाशिकचे समन्वयक संजय भांबरे, आदींनी चंद्रपूर जिल्ह्याची भेट घेऊन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी सरपंच परिषद तसेच स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट कायद्याबाबत चर्चा केली. यावेळी सरपंच संसदेचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक व जि. प. सदस्य संजय गजपुरे उपस्थित होते. चंद्रपूर भेटीप्रसंगी समन्वयक पाटील यांनी गुरनुले यांचा सत्कार केला. जि. प. अध्यक्ष गुरनुले यांनी जिल्ह्यातील विविध नावीन्यपूर्ण विकासकामांची माहिती दिली.
सरपंच संसदेत जि. प. अध्यक्ष सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST