शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

२ मार्चपासून सरस महोत्सव ‘स्वयंसिद्धा’

By admin | Updated: February 27, 2017 00:42 IST

ग्रामविकास विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने ...

सांस्कृतिक कार्यक्रम: महिला बचत गटाचे आकर्षक उत्पादनाचे स्टॉलचंद्रपूर : ग्रामविकास विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रकरिता विभागस्तरीय सरस महोत्सवाचे आयोजन स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे २ ते ६ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्याील २५६ महिला स्वंयसहाय्यता समूहाचे स्टाल विक्री व प्रदर्शनी करीता राहणार आहेत.सरस महोत्सव स्वयंसिद्धा २०१७ चे उद्घाटन दोन मार्चला सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आदिवासी विकास मंत्री ना. अंबरीश राजे सत्यवानराव आत्राम यांच्या हस्ते केल्या जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, खा. अशोक नेते, आ. नाना शामकुळे, आ. मितेश भांगडिया, आ.विजय वडेट्टीवार, आ. किर्तीकुमार भांगडिया, आ. सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, गडचिरोलीची जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोत्ती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवण, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, बांधकाम व शिक्षण समितीच ेसभापती देवराव भोंगळे, बालकल्याण समिती सभापती सरीता कुडे, सभापती ईश्वर मेश्राम, सभापती नीलकंठ कोरांगे उपस्थित राहणार आहेत. सरस महोत्सव स्वयंसिद्धा २०१७ मध्ये दररोज सायंकाळी ७ वाजतापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ मार्चला प्रख्यात गजल नवाज भिमराव पांचाळ यांचा गजल गायनाचा कार्यक्रम ३ मार्च ला प्रख्यात कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे बहादार नृत्य, ४ मार्चला झाडीपट्टी भाषेतील गाजलेले नाटक ‘असा नवरा, नको ग बाई’, ५ मार्चला ओडीसी नृत्यांगणा बिंदू जुनेजा यांचे नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)