शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

विविध ठिकाणी साजरी झाली संताजी जगनाडे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

फोटो आहे सोमय्या पाॅलिटेक्नीक, चंद्रपूर चंद्रपूर : येथील सोमय्या पाॅलिकेक्नीकमध्ये संस्थेचे अध्यक्ष पी.एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर ...

फोटो आहे

सोमय्या पाॅलिटेक्नीक, चंद्रपूर

चंद्रपूर : येथील सोमय्या पाॅलिकेक्नीकमध्ये संस्थेचे अध्यक्ष पी.एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसन आदींची उपस्थिती होती. यावेळी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष पी.एस. आंबटकर यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्राबद्दल मार्गदर्शन करताना संताजी महाराज त्यावेळचे संत हे माळकरी, टाळकरी नसून प्रस्थापित समाज व्यवस्थेवर वार करणारे खरे वारकरी होते. तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

----

नवखळा येथे कार्यक्रम

नागभीड : नवखळा येथील हनुमान मंदिरात संत शिरोमनी संताजी‌ जगनाडे‌ महाराज‌ यांची जयंती साजरी करण्यात‌‌ आली. साहित्यिक संजय येरने यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. ‌याप्रसंगी‌ तेली समाज नवखळाचे सचिव यशवंत ठाकरे, श्रीकृष्ण देव्हारे,मनोहर समर्थ, नंदेश्वर सातपैसे, मनोज ठाकरे, सद्स्य राजेंद्र कावळे,शरद कावळे, तुळशिदास सातपैसे, खुशाब कावळे, मुकेश सहारे, सविता समर्थ, मिना कावळे, लता कावळे, निशा कावळे,वनिता समर्थ, निर्मला तरारे,ज्योती कावळे, रजनी कावळे, शामराव सातपैसे , बाळा सातपैसे, मातादिन वरखडे, पुरुषोत्तम बोरघरे,रंजन तरारे,गुलाब तरारे,चांगदेव चौधरी उपस्थित होते.

---

ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

बल्लारपूर : तेली समाज युवक संघटना आणि बल्लारपूर मित्र मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना मास्क, सॅनेटायझर आणि फळवाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी सामाजिक संघटनेचे मनोज बेले, आशिष देवतळे, भाऊसाहेब येगीनवार, धर्मेश लोहकरे, लोमेश वैरागडे, हरिदास आंबटकर, संजय कोपरकर, सुरेश हजारे, उमेश कुंडले, कमलेश कोटरंगे, डॉ. आनंद बावणे, मंगेश झाडे, बुटले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

-

फोटो

पळसगाव येथे कार्यक्रम

पळसगाव :बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे तेली समाज संघटना तसेच मित्र मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक व मित्र मंडळ तसेच संयोजक रुपेश इटनकर, गगन शेंडे, नूतन इतनकर, सुचित्रा गाले, मनोज इटनकर, रमेश हिवरे, नंदा इटनकर, सुभाष गाले, नितीन वांढरे, माया इटनकर, राजू गाले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

---

फोटो

विसापूर येथे कार्यक्रम

विसापूर : येथील तेली समाजा तर्फे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.. यानिमित्त विसापूर तेली समाज कार्यकारी मंडळातील विजय गिरडकर, प्रवीण इटनकर, नंदकिशोर ढेंगरे, विलास गिरडकर, बंडू गिरडकर, नरेंद्र इटनकर, शंकर गिरडकर व तेली समाज युवा नेतृत्व अशिष गिरडकर, अक्षय देशमुख, रोशन गिरडकर, हर्षल गिरडकर, प्रशांत रागीट, पवन गिरडकर, राहुल गिरडकर आदी उपस्थित होते. संचालन पुजा गिरडकर, आभार पंकज गिरडकर यांनी मानले. तेली समाजातील तरुणांनी संताजी जगनाडे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करावी असा संदेश यावेळी देण्यात आला.