रितेश तिवारी,
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
--------
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले. संजय देवतळे यांनी पक्षीय राजकारण, मतभेद विसरून जनसेवा केली. वरोरा- भद्रावती विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक लोकोपयोगी विकासकामे केली. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता हरपला आहे.
राखी कंचर्लावार, महापौर, चंद्रपूर
---------
अजातशत्रू, मनमिळावू स्वभावाचे धनी, माझे राजकीय सहकारी, मित्र संजय देवतळे यांच्या निधनाने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. जिल्ह्ताया विकासात त्यांनी बहुमोल हातभार लावला. लोकप्रिय नेता व अभ्यासू नेत्याला गमावले आहे. त्यांचे जाणे जिल्ह्यातील न भरून निघणारी हानी आहे.
प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर
-------
माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने जिल्ह्यातील कर्तबगार नेतृत्व हरपले. अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्त्व, जनतेचे प्रश्न सोडविणारे कर्तबगार नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती जनसामान्यांत होती. त्यांच्या निधनाने सामाजिक हानी झाली आहे.
डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष, भाजप चंद्रपूर महानगर.