शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे पेरजागड परिसरात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

तळोधी (बा) : तळोधी बाळापूर परिसरातील पेरजागड सात बहिणी डोंगर एक धार्मिक स्थळ मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी येथे ...

तळोधी (बा) : तळोधी बाळापूर परिसरातील पेरजागड सात बहिणी डोंगर एक धार्मिक स्थळ मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी येथे दोन दिवसांची यात्रा भरते. शिवरात्रीच्या दिवशी यात्रेत डोंगरावर वसलेल्या महादेव मंदिरात पूजा केली जाते. स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे पेरजागड परिसराची स्वच्छता करण्यात आली.

भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक परिसरातील ग्रामस्थांद्वारे महाप्रसादाचे आयोजन केले जाते; परंतु यावर्षी कोरोनाच्या खबरदारीच्या कारणामुळे पोलीस विभागाने यात्रेला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ही परंपरा खंडित झाली. तरीही हजारो भाविक येथे आले आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात प्रार्थना केली आणि परत गेले.

हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. तळोधी बाळापूर वनक्षेत्रांतर्गत येणारा पेरजागड सात बहिणी डोंगर ताडोबा अभयारण्याला लागूनच असून, नवीन घोषित घोडाझरी अभयारण्याच्या मुख्य कोअर भागात पडतो, हा परिसर सारंगड बीटमध्ये येत आहे. वन्यजीवन येथे मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राण्यांचे प्रमाण बरेच आहे. ज्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल यासारखे मोठे प्राणी सदैव फिरत असतात आणि या दगडी टेकडीवर शेकडो मोठ्या मधमाशांची पोळे आहेत. या मधमाशांद्वारे पर्यटकांवर वर्षभर बऱ्याचदा हल्ले होतात आणि त्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यात माणसे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुण दुचाकी आणि कारने जंगलात येतात. नंतर जेवणानंतर प्लास्टिक, पाण्याची बाटली, प्लास्टिक आणि थर्माकोलचे पत्रावळी, मुलांचे डायपर या परिसरात टाकले जातात.

वन्यजीव अभ्यासक आणि स्वाब नेचर केअर सोसायटीचे अध्यक्ष यश कायरकर हे पक्षी निरीक्षणसाठी परिसराकडे गेले असता त्यांनी एका अस्वलाच्या कुटुंबाला इथे फेकलेल्या मुलांचे डायपर तोडताना पाहिले आणि तेव्हापासून, जंगलाला लागूनच असलेल्या जंगलातील मंदिरे, तलावाचे आवार आणि मार्ग प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्याअंतर्गत संस्थेद्वारे प्रत्येक आठवड्यात ‘धेय प्लास्टिकमुक्त निसर्ग अभियान’चे परिसरात आयोजन केली जाते. त्यानुसार महाशिवरात्रीच्या २ दिवसांनंतर पेरजागड परिसरात स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वाब नेचर केअर सोसायटीचे अध्यक्ष यशवंत कायरकर, उपाध्यक्ष स्वप्नील बोधनकर, सदस्य हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, सूरज गेडाम, कुणाल रामटेके, अनिकेत बावणे, येनोली (माल)चे वनरक्षक एस.एस. गौरकर आणि सारगगंड बीटचे वनरक्षक एस. यम. जुमनाके यांनीही मदत केली.