शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

संदीप सीमेवर निघाला अन् निरोपाचा क्षणही गहिवरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:54 IST

भारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही.

लेह- लद्दाखमध्ये नियुक्ती : संपूर्ण गाव झाले गोळाघनश्याम नवघडे नागभीडभारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही. पण अशाही परिस्थितीत बाम्हणी येथील नागरिकांनी गावच्या एका सुपूत्राला लेह- लद्दाख येथे जाण्यासाठी सोमवारी अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी संपूर्ण गाव गोळा झाले. या भावस्पर्शी प्रसंगामुळे संपूर्ण ग्रामस्थ भारावले होते. नागभीडपासून सहा किमी अंतरावर असलेल्या बाम्हणी येथील गणूजी नन्नावरे यांची परिस्थिती अगदी बेताचीच. त्यांना एकूण सहा मुले, त्यात चार मुली आणि दोन मुले यातील संदीपची देहयष्टीे बऱ्यापैकी. त्याची सैन्यात जायची मनपासून इच्छा. त्यादृष्टीने त्याने प्रयत्नसुद्धा चालविले आणि यात त्याला यशही आले.मागील महिन्यात संदीपचे सैन्यविषयक प्रशिक्षण गोवा येथे आटोपले. प्रशिक्षण आटोपल्यानंतर संदीपला नियुक्तीचा आदेश मिळाला. ४ नोव्हेंबर रोजी त्याला रुजू होण्याचेसुद्धा या आदेशात म्हटले असल्याने ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संदीपने घरुन निघण्याचे निश्चित केले. एव्हाना संदीपची सैन्यात निवड झाली आणि तो नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघणार आहे, ही वार्ता छोट्याशा बाम्हणीमध्ये कर्णोपकर्णी झाली आणि जो तो संदीपच्या घरी जावून संदीपला शुभेच्छा देऊ लागला.या शुभेच्छा मागे एक वलयसुद्धा आहे. एक तर बाम्हणी या गावातील संदीप हा पहिलाच युवक आहे की ज्याची सैन्यात निवड झाली आणि तीसुद्धा युद्धजन्य परिस्थिती असलेल्या लेह- लद्दाखमध्ये. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी हूरहूर होती. अगदी भावूक होऊन प्रत्येक जण संदीपला निरोप देत होता आणि गावचा एक तरुण देशाच्या रक्षणासाठी जात आहे, याचा अभिमानही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. ही चहलपहल संदीपच्या घरी अगदी सोमवारी दिवसभर सुरु होती.शेवटी संध्याकाळी गावच्या बसथांब्यावर संदीप आला, तेव्हा गावकऱ्यांनी आणखी संदीपभोवती गराडा घातला. बस आली. संदीप बसमध्ये चढला आणि संदीपने बसमधून निरोपाचा हात हलविला. तेव्हा तमाम गावकऱ्यांच्या नेत्रकडा पाणावल्या होत्या. निरोपाचा हा क्षणही गहिवरून गेला होता, मात्र बाम्हणीचा हा वीर नवजवान भारतमातेच्या रक्षणासाठी पुढे निघाला होता.