शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियाचा तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

भद्रावती तालुक्यातील  चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदार यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. ही घटना रविवारी सकाळी  १० वाजताच्या सुमारास  घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती तालुक्यातील  चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदार यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. ही घटना रविवारी सकाळी  १० वाजताच्या सुमारास  घडली. धडक एवढी गंभीर होती, की या घटनेची माहिती मिळताच शेगाव व भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात  तहसीलदार डॉ. अनिकेत सोनवणे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. सहकारी नायब तहसीलदार   शंकर भांदककर, विलोडाचे तलाठी कैलास पुसनाके, तलाठी श्रीकांत गीते सुदैवाने     बचावले. विलास पांडुरंग भागवत (४o) रा. चंदनखेडा असे  ट्रॅक्टरचालक- मालक आरोपीचे नाव आहे. तो टॅक्टरने (क्रमांक एम एच ३४ बी जी २३४३) रेती घाटावरून रेती चोरून नेत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार डॉ. सोनवणे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनांनी चंदनखेडा परिसर कारवाईसाठी गाठले. तेव्हा त्यांनी चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. चालकाने ट्रॅक्टर थांबविले. त्यानंतर ट्रॅक्टरचालक व मजुरांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर स्वतः विलास भागवत याने ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेऊन तहसीलदारांच्या  गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात ते वाहन २० फुटापर्यंत फरफटत गेले. यात तहसीलदार यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  नायब तहसीलदार शंकर भांदककर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास भागवत याला अटक केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया