शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेटचे एसडीओंना निवेदन

By admin | Updated: June 29, 2016 01:10 IST

विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शालेय प्रवेशासाठी व इतर शासकीय कामांसाठी विविध दस्ताऐवजाची व प्राणपत्राची आवश्यकता असते.

ब्रह्मपुरी : विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शालेय प्रवेशासाठी व इतर शासकीय कामांसाठी विविध दस्ताऐवजाची व प्राणपत्राची आवश्यकता असते. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्याच विद्यालय व महाविद्यालयात आवश्यक प्रमाणपत्र व दाखले मिळवून देण्याची व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीने पाठविले आहे. विद्यालयात तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय व अधिवास दाखला आदी प्रमाणपत्राची गरज भासते. त्यासाठी बऱ्याचशा ग्रामीण विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतो. त्यातही दलालांकडून आर्थिक लूट होते. अशा विविध त्रासांपासून विद्यार्थी व पालकांची सुटका करण्यासाठी प्रत्येक विद्यालय तथा महाविद्यालयात शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे मार्गदर्शन करुन शिबिर आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करताना होणारा त्रास कमी होईल. यावेळी राजस्व अभियानही राबवावे असे संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीने म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष महेश पिलारे, तालुका उपाध्यक्ष अंकुश मातेरे, गोवर्धन दोनाडकर, सचिव आशिष नागदेवते, कार्याध्यक्ष दीपक ढोरे, अ. वि. सहारे, विक्की कसार, मिथुन चौधरी, बंटी गोंडाने, रामू मेश्राम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)