शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या नावावर ‘टप्पर’ हेल्मेटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:34 IST

चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनात एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले. यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात हेल्मेट विक्री जोरात सुरू असून अनेक व्यवसायिक अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री करीत आहेत. दुचाकीस्वारही ‘रस्ते का माल सस्ते मे’ म्हणत ‘टप्पर’ हेल्मेटची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ‘रस्ते का माल’ विकला जातेय ‘सस्ते मे’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनात एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले. यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात हेल्मेट विक्री जोरात सुरू असून अनेक व्यवसायिक अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री करीत आहेत. दुचाकीस्वारही ‘रस्ते का माल सस्ते मे’ म्हणत ‘टप्पर’ हेल्मेटची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यात घडलेल्या दुचाकी अपघाताच्या तीन घटनांनतर पोलीस विभाग नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. चंद्रपूर शहरात दररोज २५ ते ३० वाहनचालकांवर हेल्मेट नसण्यावरून कारवाई केली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वार धास्तावले असून सुरक्षेसाठी नाही तर कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण ‘टप्पर’ हेल्मेट खरेदी करताना दिसून येत आहे.चंद्रपूर शहरात गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटण्यात आली आहे. अनेक चष्मे विक्रेतेही हेल्मेटची दुकान लावून बसले आहेत. हेल्मेट विक्रीबाबत माहिती जाणून घेतली असता, चक्क १०० ते १५० रूपयांत हेल्मेटची विक्री होत असल्याचे आढळून आले. १०० रूपयात मिळणाºया हेल्मेटने खरच डोक्याला सुरक्षा मिळेल काय, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.शहरात विक्रीला असलेले अनेक हेल्मेटवर आयएसआय मार्क दिला असला तरी त्या हेल्मेटच्या गुणवत्तेवर नक्कीच शंका उपस्थित होतात. साधारण दर्जाचा हेल्मेट घेतो म्हटले तरी ५०० रूपये मोजावे लागतात. अशात आयएसआय मार्क दाखवून १०० रूपयात अप्रमाणित हेल्मेट सर्रास विकले जात आहेत.यामुळे एखाद्या वेळेस अपघात घडल्यास उलट हेल्मेटमुळेच जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालकांची हेल्मेटच्या दुकानावर गर्दी वाढली असून हेल्मेटचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बनावट आयएसआय क्रमांकासोबत बाजार भावापेक्षा कमी पैसे घेऊन हेल्मेटची धडाक्यात विक्री सुरू असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.फक्त पोलिसांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांकडून हा खटाटोप सुरू असल्याचे दिसून येत असून प्लास्टिकपासून बनविलेले हलक्या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्री करताना हेल्मेट विके्रते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्ड ग्राहकाला देत नाही. त्यामुळे अल्पवधीत हेल्मेट तुटल्यास ग्राहकालाही नाईलाज आहे. सध्या विक्री केले जात असलेले हेल्मेट खाली पडल्यास तडे जाऊ शकतात, अशा दर्जाचे असल्याने खड्डेमय रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात वाहनचालकाचे संरक्षण करणार काय, ही शंकाच आहे.मोटार वाहन कायद्यातील कलम १२९ मध्ये हेल्मेटबाबत स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार, दुचाकी चालविणाऱ्याने व दुचाकीवर प्रवास करणाऱ्याने आयएसआय प्रमाणित हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. परंतु, या तरतुदीचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.चंद्रपुरातील वाहतूक पोलीस केवळ वाहन चालकाने हेल्मेट घातले आहे किंवा नाही एवढीच शहानिशा करत असून ते हेल्मेट कायद्यानुसार आहे काय, हेही तपासले जाणे गरजेचे आहे. मात्र यात चालकांवर कारवाई करण्यापेक्षा हेल्मेट विक्रेत्यांवरच कारवाई करणे गरजेचे आहे.कारवाईच्या भीतीपोटी हेल्मेटची खरेदीहेल्मेट खरेदी करताना वाहनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती बाळगून कारवाईपासून वाचण्यासाठी हेल्मेट खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसून येत असून हेल्मेटची गुणवत्ता आणि किमंत यासाठी जबाबदार विभाग सुस्त दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विके्रत्यांची चांदी होत आहे. मात्र हेच निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वाहन चालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. वाहन चालकांच्या जिवाशी खेळणारा हेल्मेट व्यवसाय जोरात सुरू असतानाही पोलीस आणि जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सोशल मीडियावर रोषअपघाताच्या दोन घटना घडताच जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली. त्यामुळे वाहनाचालकांवर कारवाई केली जात आहे. यामुळे सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाप्रति रोष व्यक्त केला जात असून हेल्मेट सक्ती योग्य आहे की अयोग्य यावर अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रृपवर चर्चा रंगत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट योग्य असले तरी खड्डे दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाला सक्ती का करू नये, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.दिल्ली, मुंबईतून हेल्मेटची आयातदेशात हेल्मेट तयार करणाऱ्या नऊ ते दहा प्रमुख कंपन्या आहेत. मात्र रस्त्यांवर किंवा काही दुकानांमध्ये विकण्यात येत असलेल्या हेल्मेटवरील आयएसआय मार्कही बनावट आहे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत ७०० ते ८०० रूपयांपासून सुरू होते. मात्र निकृष्ट दर्जाचे हेल्मेट केवळ १५० ते २०० रूपयांत मिळत आहेत. चंद्रपूर शहरात हेल्मेट विक्रीचे जवळपास शंभरहून अधिक दुकाने लागली असून दिल्ली, मुुंबई, येथून आयात केलेल्या हेल्मेटची विक्री करीत असल्याचे एका दुकाणदाराने सांगितले.चांगल्या दर्जाच्या हेल्मेट विक्रीकडे लक्ष द्या : इको-प्रोशहरात सध्या हेल्मेट विक्री ऊत आला आहे. मात्र अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री केली जात असून चांगल्या दर्जाचे व पूर्ण सुरक्षितता असणारे चांगल्या दर्जाच्या हेल्मेट विक्रीकडे लक्ष देण्याची मागणी इको-प्रो संघटनेने पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, अमोल उट्टलवार, हरीष मेश्राम उपस्थित होते. सध्या शहरात विक्री केले जात असलेले हेल्मेट निकृष्ठ व केवळ पोलीस कारवाईपासून वाचविणारे असून कुठलीही सुरक्षा नसल्याचे म्हटले आहे.