शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:25 IST

शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रातील चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर तालुक्यातील चेक माणकापूर येथील ऋषी मडावी यांचा २८ आॅगस्टला फवारणी करताना मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील येवती येथील मंगेश निकुरे हा संजय चिमूरकर या शेतकºयांकडे नोकर होता. मालकाच्या सांगण्यावरुन ४ सप्टेंबर रोजी कपाशीवर फवारणीसाठी गेला असता काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे भरती केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोबतच अन्य शेतकऱ्यांनाही विषबाधा झाली आहे. परंतु फवारणी करताना वापरलेले कीटकनाशक कोणत्या कंपनीचे होते व कोणत्या कृषी केंद्रातून खरेदी करण्यात आले याची चौकशी करण्यात आली नाही. जिल्ह्यात बंदी असलेली कीटकनाशके अनेक कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कृषी केंद्रांची चौकशी करून संबंधित कंपनी व कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश रामगुंडे यांच्यासह हिराचंद बोरकुटे, डी. के. आरीकर, डॉ. देव कन्नाके, अ‍ॅड. गणेश गिरीधर, रवी ढवस, रवींद्र बोरकर, सूर्यभान झाडे, धननजय जीवने उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी